Navratri 2023 : नवरात्रीसाठी देवीला दाखवा ‘या’ गोड पदार्थांचा नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी

नवरात्रौत्सवाचा आजचा सातवा दिवस असून आज देवीला खास नैवेद्य दाखवला जातो.
Navratri 2023 Recipe
Navratri 2023 Recipeesakal

Navratri 2023 : सध्या देशात नवरात्रौत्सवाची धामधूम पहायला मिळत आहे. आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीमध्ये आजच्या सप्तमीचे विशेष महत्व आहे. नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये देवीची ९ रूपांमध्ये भक्तीभावाने पूजा केली जाते.

या ९ दिवसांमध्ये विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. अनेक जण या ९ दिवसांमध्ये उपवास करतात आणि देवीला रोज स्वादिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवतात.

आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी खास २ रेसिपीजबद्दल जाणून घेणार आहोत. कोणत्या आहेत त्या रेसिपी ? चला तर मग जाणून घेऊयात.

नारळाची बर्फी

देवीला नारळाच्या बर्फीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. नारळाची बर्फी करण्याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि हा पदार्थ करायला जास्त साहित्याची गरज ही पडत नाही.

ही रेसिपी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी ओला नारळ किसून घ्या.

  • नारळ किसून घेतल्यानंतर एका बाजूला कढईमध्ये तूप गरम करून घ्या आणि त्यात साखर घाला. (तुमच्या अंदाजानुसार)

  • किसलेला नारळ, तूप आणि साखर हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या.

  • हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करा.

  • त्यानंतर, एका ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण पसरवा.

  • आता थंड झाल्यानंतर बर्फीच्या आकारामध्ये वड्या कापून घ्या.

  • तुमची नारळाची बर्फी तयार आहे.

Navratri 2023 Recipe
Navratri Vrat Recipe : उपवासात ट्राय करा वरईचे टेस्टी कटलेट, जाणून घ्या रेसिपी

शेवयांची खीर

खीर हा पदार्थ आपल्याकडे नेहमी केला जातो. देवीला गोडाचा नैवेद्य दाखवण्यासाठी शेवयांची खीर हा उत्तम पर्याय आहे. खीरमध्ये अनेक प्रकार येतात. तांदळाची, साबूदाण्याची इत्यादी अनेक प्रकारांची खीर तुम्ही करू शकता. शेवयांची खीर बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज ही भासत नाही.

शेवयांची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • दूध

  • साखर

  • तूप

  • ड्रायफ्रूट्स

  • शेवया

अशी बनवा शेवयांची खीर

  • एका पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करा.

  • हे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये बदाम, काजू, मनुके भाजून घ्या आणि थंड व्हायला ठेवा.

  • त्यानंतर, वाटीभर शेवया घ्या आणि त्या तूपामध्ये भाजून घ्या.

  • शेवया भाजून घेताना त्या करपणार नाहीत, याची काळजी घ्या.

  • शेवया भाजून झाल्यानंतर त्या थंड व्हायला ठेवा.

  • आता त्या पॅनमध्ये अर्धा लीटर दूध उकळून घ्या.

  • दूध चांगले उकळल्यावर त्यात शेवया घाला आणि त्या चांगल्या शिजू द्या.

  • शेवया शिजल्यानंतर आणि दूध घट्ट झाल्यानंतर त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि साखर घाला.

  • आता खीर ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.

  • खीर शिजल्यानंतर गॅस बंद करून खीर सर्व्ह करा.

Navratri 2023 Recipe
Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंगदार साबुदाणा अप्पे! ही झटपट रेसिपी नक्की करा ट्राय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com