Navratri 2023 : नारायणी नमोस्तुते! आई अंबाबाईची आज सिंहारूढ नारायणी रूपातील पूजा

देवीच्या मागे असलेलं सप्तशती महामंत्र म्हणजे नक्की काय आहे?
Navratri 2023
Navratri 2023 esakal

Navratri 2023 : नवरात्रीच्या सातव्या दिवशी आज करवीर निवासिनी आई अंबाबाईची नारायणी रूपातील पूजा बांधण्यात आली. या रूपामध्ये करवीर निवासिनीच्या पाठीमागे सप्तशती महायंत्राचे तसेच सप्तमातृकांचे दर्शन घडते आहे.

सप्तशती महायंत्राच्या मध्यभागी बिंदू स्थानावरती सर्वस्याद्यशक्ती आई अंबाबाई हातामध्ये म्हाळुंग गदा ढाल आणि पानपात्र ही आयुध धारण करून सिंहावर विराजमान आहे. जगदंबेचे हे रुप नारायणी या नावाने देखील ओळखले जाते.

नारायणी म्हणजे नारायणाची म्हणजे विष्णूची पत्नी म्हणून नारायणी नव्हे तर, नारायणी म्हणजे जगताचा सांभाळ करणारी शक्ती म्हणजे नारायणी. जिच्याकडे जगत घडवण्याची सांभाळण्याची आणि मोडण्याची ताकद आहे ती शक्ती म्हणजे नारायणी.

Navratri 2023
Navratri Festival : नवरात्रोत्सवातील उत्साह पोचला टिपेला, करवीर निवासिनी अंबाबाईची उद्या नगरप्रदक्षिणा

नारायणी ब्रम्हा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांना जन्म देणारी सर्वस्यआद्य शक्ती आहे. आदिशक्ती आहे त्यामुळे महालक्ष्मी म्हणजे विश्वाचे परब्रम्ह तर अंबाबाई म्हणजे जगताची माता या दोन नावाने तिला ओळखलं जातं.

आज आपल्या या मूळ स्वरूपामध्ये सप्तशती महायंत्रासह, त्याच्यामध्ये मूळ त्रिकोण जिथे महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्यानंतर षटकोन अष्टदळ आणि 24 पाकळ्यांच्या कमळासह भूपुरामध्ये या यंत्राची पूजा केली जाते.

देवीच्या मागे असलेलं सप्तशती महामंत्र म्हणजे नक्की काय आहे?

दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलेल्या सर्व देवतांची पूजा या यंत्रामध्ये असते. या यंत्राची अधिष्ठात्री देवता आहे श्री क्षेत्र करवीर निवासिनी अंबाबाई आहे. कारण सगळी सप्तशती शेवटी हिच्याच भोवती फिरते. (Navratri 2023)

देवीची आजची आकर्षक पूजा
देवीची आजची आकर्षक पूजाesakal
Navratri 2023
Navratri Festival : कोल्हापूरच्या अंबाबाईची मोहिनी रूपात पूजा; तुळजा भवानी दिसली केळीच्या बनात

श्रीदेवी महात्म्याचा (सप्तशती) अकरावा अध्याय 'नारायणी स्तुती' या नावाने ओळखला जातो. या अध्यायात श्रीदेवीची स्तुती करताना म्हणले आहे, 'त्वयैकया पूरितमम्बयैतत् अर्थात हे माते! हे सर्व विश्व तू एकटीनेच व्यापलेले आहेस.

याच अध्यायात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्री, चामुंडा या रुपात असणाऱ्या हे नारायणी! तुला नमस्कार असो.' असे देवीचे स्तवन केले आहे.

विश्वातील वेगवेगळ्या शक्ती ही एका आदिशक्तीचीच विविध रूपे आहेत. दर्शवणारी सप्तमातृकाशक्ति श्रीदेवी मातेची ही आजची महापूजा आहे. देवीची ही पूजा श्रीपूजक आशुतोष ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांन साकारलेली आहे. (Kolhapur Ambabai Temple)

Navratri 2023
Kolhapur Ambabai Temple : गरुड मंडपासमोरून भाविकांना श्री अंबाबाई देवीचे मुखदर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com