
Navaratri 2025
Sakal
नवरात्री २०२५ मध्ये महिलांसाठी क्लासी स्टाइल स्टेटमेंट म्हणून विविध रंगांच्या साड्या आणि घागरा खूप लोकप्रिय ठरत आहेत. स्टेटमेंट ब्लाऊज आणि आरी वर्कच्या फॅशन ट्रेंडमध्ये पारंपरिक हस्तकलेला महत्त्व दिले जात आहे. साड्यांसाठी सिल्क, खादी कॉटन, बनारसी, कांजीवरम यांसारख्या फॅब्रिक्सची मागणी वाढली आहे.
पृथा वीर
navratri 2025 saree and ghagra fashion trends for women in nine colors: नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला. यावर्षी महिलांचा स्टेटमेंट ब्लाऊज आणि आरी वर्कवर भर आहे. फॅशन ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा हाताने विणलेल्या पारंपरिक कलाकुसरीला मागणी आहे; तसेही नवरात्रीचे नऊ दिवसही वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आणि घागरा यांना खुलवणारे ब्लाऊज यासाठी फॅशन एक्स्पर्ट सध्या व्यस्त आहेत.