
Garba and Dandiya Nights:
Sakal
नवरात्रीमध्ये भारतातील सहा शहरांमध्ये गरबा आणि दांडियाची धूम असते.
या नृत्य प्रकारांमध्ये भक्ती, एकता आणि आनंदाचे सांस्कृतिक अभिव्यक्ती दिसतात.
नवरात्रीच्या काळात मित्रांसह या शहरांना भेट देऊन या उत्सवाचा आनंद घेऊ शकता.
यंदा नवरात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू झाला असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. देशभरात नऊ रात्री भक्ती, उपवास, प्रार्थना आणि उत्साहपूर्ण उत्सव पाहायला मिळतो. सर्वत्र नऊ दिवस रात्री गरबा आणि दांडियाची धुम पाहायला मिळते. देवी शक्तीला समर्पित गरबा, जीवनाच्या शाश्वत चक्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकाग्र वर्तुळात सादर केला जातो. या खेळांचा आनंद घेताना सुंदर पद्धतीने तयारी केली जाते. जर तुम्ही या नवरात्रीत प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर गरबा आणि दांडिया उत्सवांचा आनंद लुटण्यासाठी मित्रांसोबत भारतातील पुढील शहरांना भेट देऊ शकता.