शांत झोप हवीय? मग त्यासाठी करा ही पाच योगासने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शांत झोप हवीय? मग त्यासाठी करा ही पाच योगासने...

शांत झोप हवीय? मग त्यासाठी करा ही पाच योगासने...

- मिलिना पाटील

पुरातन काळापासून चालत आलेली व्यायाम पद्धती म्हणजे योगा. सुमारे 5000 साल पुर्वीपासून योग अभ्यास भारतात केला जातो. या व्यायाम पद्धतीचा उल्लेख ऋग्वेदात देखील करण्यात आला आहे. काही काळाने पतंजली या संस्थेने योगाचे पद्धतशीर सादरीकरण केले आणि आज देखील शरीर स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी या व्यायामपद्धतीचा अभ्यास केला जातो.

एक – दीड वर्षापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगत कोरोनाने भिषण तांडव घातलेला आहे. अशात लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या आप्तजनांची मानसीक व शारिरीक दुर्गती किंवा काहींना मृत्यूला देखील सामोरे जावे लागले. यावर भर म्हणजे अधीक लोकांना नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या. अशा या नैराश्याच्या वातावरणात शरिरीक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी आणि स्वस्थ ठेवणे व शांत झोप आवश्यक ठरते.

महामारी आणि प्रदीर्घ लॉकडाऊनने लोकांच्या दिनचर्यात प्रचंड बदल केला आहे. या सोबत झोपेचे चक्र देखील बिघडले आहे. शरिर निरोगी राहण्यासाठी शांत झोप खूप आवश्यक आहे. जर शांत झोप नसेल लागत तर काही विशिष्ट योगासने केल्याने शांत झोप होऊ शकते.

आयुर्वेदिक तज्ञ डॉ नितिका कोहली यांनी इंस्टाग्रमद्वारे सांगितले की, हळूवार व्यायम केल्याने शरीर शिथिल होते. याने कृतज्ञता, आत्म-सहानुभूती आणि समाधान देखील प्रप्त होते आणि झोपण्यापुर्वी केल्याने झोप देखील शांत लागते. यासाठी त्यानी पाच व्यायाम सांगितले आहे ज्याचे नित्य अभ्यास करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: राजस्थानमध्ये राजकीय भूकंप! गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

1) बालासन

या आसनामुळे मन शांत आणि शिथिल होण्यास मदत होते.

2) सलभासन

हा व्यायाम केल्याने स्नायूंना आराम मिळतो व झोप चांगली लागते.

3) जानू सिरसासन

दैनंदिन योगामध्ये हे योग आसन केल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारते.

4) उत्तानासन

या आसनामुळे पूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो. हे नियमित केल्याने झोपेत देखील फरक जानवतो.

5) शवासन

हे नरव्हस सिस्टम शांत करण्यास मदत होते व आपले खांदे व स्नायुंना शिथिल करण्यास मदत होते. मात्र हे आसन सर्वात शेवटी केले पाहिजे.

loading image
go to top