

Nepal Floods
sakal
नेपाळमध्ये बुधवारी भोटे कोशी नदीच्या परिसरात अचानक भीषण पूर आला. रसुवा जिल्ह्यातील नेपाळ-तिबेट सीमेच्या जवळ सकाळी सुमारे ९ वाजता हा महापूर आला. पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि माती वाहून आली. त्यामुळे अनेक घरं, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचं मोठं नुकसान झालं.