esakal | चहासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; निर्माण होतील शारीरिक समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

Tea

चहासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

चहा (tea) म्हणजे अनेकांचं पहिलं प्रेम. वेळ-काळ कोणताही असो चहाप्रेमी चहा घ्यायला कधीही नाही म्हणत नाहीत. गप्पांची मैफील असो वा धुवांधार कोसळणारा पाऊस. या अशा रम्य वातावरणात चहा हवाच. बरं आता चहा केला तर सोबत काहीतरी चटपटीत पदार्थ हवेच ना. अनेकांना चहासोबत बिस्कीट, चिवडा किंवा तत्सम तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु, ही सवय तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळेच चहासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत हे आज जाणून घेऊयात. (never eat these things with tea the body can be harmed)

१. डाळीच्या पिठाचे पदार्थ -

चहा घेतांना कधीही डाळीच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ खाऊ नये. अनेक जणांना शेव,फरसाण खाण्याची सवय असते. मात्र, हे पदार्थ कधीही खाऊ नये. चहासोबत हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील पोषक तत्वे कमी होतात आणि पचनसंस्थेशी निगडीत समस्या निर्माण होतात.

हेही वाचा: Fact Check : कोविड व्हॅक्सिन घेतल्यावर दोन वर्षात होतो मृत्यू?

२. कच्चे पदार्थ टाळावेत -

पालेभाज्या, फळे हे पदार्थ कच्चे खाल्ले तर त्याचा शरीरासाठी फायदा होतो. परंतु, चहासोबत कधीही हे पदार्थ कच्चे खाऊ नये. अनेक जण हाफ बॉइल एग्ज खातात परंतु, त्यामुळे शरीराला उपाय होऊ शकतो. म्हणूनच, चहासोबत कधीही उकडलेली अंडी आणि मोड आलेले कडधान्य वाफवून खावेत.

३. थंड पदार्थ टाळावेत -

चहा गरम असतो. त्यामुळे या उष्ण पदार्थासोबत थंड पदार्थ खाणं टाळावं. चहा प्यायल्यावर लगेच गार पाणी पिऊ नये. त्यामुळे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. अनेकदा अॅसिडिटीची समस्यादेखील निर्माण होते.

४. आंबट पदार्थ नकोच -

अनेक जणांना लेमन टी पिण्याची सवय असते. मात्र, दररोज हा चहा पिणं योग्य नाही. अतिप्रमाणात आम्ल पदार्थ पोटात गेल्यामुळे अॅसिडिटी, पचनाची समस्या, गॅस या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे आठवड्यातून केवळ २ वेळा हा चहा घ्यावा. मात्र, दररोज नको.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)