esakal | Fact Check : कोविड व्हॅक्सिन घेतल्यावर दोन वर्षात होतो मृत्यू?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

Fact Check : कोविड व्हॅक्सिन घेतल्यावर दोन वर्षात होतो मृत्यू?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

वर्षभरापूर्वी देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूची सध्या दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहेत. मात्र, याच काळात सोशल मीडियावर (Social Media) लसीकरणाबाबत अनेक अफवांनादेखील (Fake News) उधाण आलं आहे. यामध्येच व्हॅक्सिन घेतल्यानंतर जीवाला धोका निर्माण होतो अशी एक माहिती वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. (covid-vaccine-fact-check-after-taking-coronavirus-vaccine-jab-person-will-die-in-2-years-check-facts)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका नोबेल विजेत्याचा हवाला असलेली पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये कोविडचं व्हॅक्सिन घेतल्यानंतर दोन वर्षांमध्ये रुग्णाचा मृत्यू होतो असा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा खोटा असून ही माहिती फेक असल्यासं पीआयबीने स्पष्ट केलं आहे. एक ट्विट करत पीआयबीने याविषयी माहिती दिली आहे. सोबतच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहनदेखील केलं आहे.

हेही वाचा: कारची चावी हरवली? नो प्रॉब्लेम आता स्मार्टफोनने करा ओपन

नोबेल विजेता आणि फ्रेंच व्हायरॉलॉजिस्ट ल्यूक माँटेनिअर यांच्या हवाल्याने एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कोरोनाची लस घेतल्यावर दोन वर्षांच्या आता रुग्णाचा मृत्यू होतो असं सांगण्यात येत आहे. सोबतच माँटेनिअर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याचं दाखवण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात ही माहिती खोटी आहे.

"नोबेल विजेत्याच्या हवाल्याने देण्यात आलेली माहिती खोटी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कोरोना लसीकरणानंतर दोन वर्षानंतर मृत्यू होईल हा दावा खोटा आहे. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे ही चुकीची माहिती फॉरवर्ड करु नका", असं ट्विट पीआयबीने केलं आहे.

दरम्यान, PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. यापूर्वीदेखील सोशल मीडियावर कोरोना व लसीकरणाविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यामागची सत्यता पडताळून पीआयबीने सत्य माहिती समोर आणली आहे.