Newborn Baby Care: धक्कादायक! 'या' कारणांमुळे दरवर्षी होतो कोट्यावधी नवजात बालकांचा मृत्यू

नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी ते आपण जाणून घेऊया
Newborn Baby Care
Newborn Baby Careesakal
Updated on

Baby Care: दरवर्षी 15 ते 21 नोव्हेंबरला बेबी केअर वीक साजरा केला जातो. नवजात बाळांचा वाढणारा मृत्यूदर रोकण्यासाठी आणि पहिल्या 6 महिन्यात बाळाची योग्यरित्या काळजी घेण्याबाबत जागृकता वाढवण्यासाठी हा वीक दरवर्षी साजरा करण्यात येतो. नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी ते आपण जाणून घेऊया.

नवजात बाळाच्या जन्मानंतर पहिले २८ दिवस फार महत्वाचे असतात. इतर कालावधीच्या तुलनेत पहिल्या २८ दिवसांत नवजात बाळाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. बाळाच्या जन्माचा पहिला महिना बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी फार महत्वपूर्ण ठरतो. या काळात निरोगी बाळ विकसित होतं.

nhp.gov च्या मते, पहिल्या २८ दिवसांत दरवर्षी 2.6 मीलियन नवजात बाळांचा मृत्यू होतो. पहिल्या आठवड्यात हे प्रमाण जास्त असतं तर अतिरिक्त 2.6 मीलियन स्टिलबर्थ (जन्माआधीच गर्भात मृत्यू) होतात. 2000 ते 2013 या काळात नवजात बाळाच्या मृत्यूचा दर 44 टक्क्यांहून घसरून 28 टक्क्यांवर आलाय.

नवजात बाळाच्या मृत्यूची कारणे

नवजात बाळाच्या मृत्यूची प्रमुख कारणे आहेत

  • प्री मॅच्युरिटी

  • प्रीटर्म

  • नवाजात बाळाला संसर्ग होणे

  • अंतर्गर्भायाशी संबंधित काही अडचणींमुळे

बाळाच्या जन्मानंतर ही काळजी अवश्य घ्या

उब, सामान्य श्वास, आईचं दूध आणि संसर्गमुक्त आरोग्य या प्रत्येक नवजात बाळाच्या प्राथमिक गरजा आहेत. त्यामुळे अशा काही गोष्टी लक्षात ठेवा.

१. बाळाला अशी अंघोळ घाला - बाळाला एक दिवसाआड कोमट पाण्याने अंघोळ घाला. आंघोळीआधी नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मॉलीश करा. आंघोळ घातल्यानंतर बाळाचे अंग स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

२. बाळाचे टेंम्प्रेचर असे नॉर्मल ठेवा - बाळाला असे कपडे घाला ज्याने त्यांचे संपूर्ण अंग झाकल्या जाईल. त्याचे डोके नेहमी झाकलेले असावे. खोलीचं तापमान सामान्यत: 25 ते 27 डिग्रीपर्यंत असायला हवं.

३. बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्ट - बाळाचा त्याच्या आई-वडिलांच्या शरीराशी थेट संपर्क येणे हा बाळाचं टेम्प्रेचर नॉर्मल ठेवण्यासाठी सुरक्षित, प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय आहे. हा उपाय बाळासाठी अतिशय लाभदायक आहे. काही बाळाचा जन्म वेळेआधी होतो तर काही बाळांचा जन्म वेळेनंतर होतो. अशा वेळी त्यांना अधिक कपडे घातल्यास हायपरथर्मिया होऊ शकतो जो बाळासाठी फार धोकादायक ठरू शकतो.

Newborn Baby Care
Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

४. न्यूट्रिशियनची गरज - बाळाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी पोषण फार महत्वाचं आहे. थंडीचा महिना बाळाचं मेटाबोलिझम रेट वाढवतो. त्यामुळे बाळाला जास्त उर्जेची गरज पडते. नवजात बाळाचं पोषण बरोबर ठेवण्यासाठी स्तनपान सगळ्यात सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे. स्तनपान बाळामध्ये सुरक्षात्मक अँटीबॉडी ट्रांसफर करतात आणि अनेक संसर्गापासून बाळाचा बचाव करतात. केवळ सहा महिने तरी बाळाला आईचंचं दूध गरजेचं असतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.