
- डॉ. मलिहा साबळे, मानसिक आरोग्यतज्ज्ञ, संस्थापक व संचालक - द हेल्दी माइंड
सणासुदीच्या व्यस्त कालावधीनंतर, नवीन वर्ष नवीन सुरुवात करण्यासाठी आणि निरोगी मनाने वर्षाची सुरुवात करण्याची संधी असू शकते. तुम्ही नवीन वर्षाच्या संकल्पांसाठी आधीच काही कल्पना केल्या असतील. तुम्ही जिममध्ये जाण्याची, कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची, नवीन नोकरी किंवा करिअरचा मार्ग शोधण्याचा किंवा जंक फूडचे प्रमाण कमी करण्याचा विचार करत असाल.