प्रियंका चोप्राच्या अमेरिकन नवऱ्याचा देवतांवर खूप 'विश्वास'; काही करण्यापूर्वी देतो 'हा' सल्ला I Priyanka Chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra

नॅशनल आयकॉन बनलेल्या प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) काही वर्षांपूर्वी निक जोनासशी (Nick Jonas) लग्न केलं.

प्रियंका चोप्राच्या अमेरिकन नवऱ्याचा देवतांवर खूप 'विश्वास'

नॅशनल आयकॉन बनलेल्या प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) काही वर्षांपूर्वी निक जोनासशी (Nick Jonas) लग्न केलं. पण, प्रियंका चोप्रा अनेकदा अमेरिकेतही आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतेय. विशेष म्हणजे, निक जोनासही कायम तिच्या धार्मिक संस्कृतीत सहभागी असतो. काही दिवसांपूर्वी प्रियंकानं स्वत : चं 'सोना रेस्टॉरंट' सुरु केलंय. मात्र, रेस्टॉरंट उघडण्यापूर्वी ती निकसोबत पूजा करुन आपल्या कामाला सुरुवात करतेय. एका पॉडकास्टमध्ये प्रियांकानं एक मजेदार खुलासा केलाय. ती सांगते, निक आणि मी आम्ही दोघेही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. त्यामुळे आम्ही दोघांनी लग्नाही दोघांच्या धर्मात केली आहेत.

प्रियांकानं व्हिक्टोरिया सीक्रेटच्या व्हीएस व्हॉईस पॉडकास्टमध्ये म्हटलंय, की आता आयुष्यात काही मोठं करण्याआधी निक मला पूजा करायला सांगतो. जरी आम्ही वेगवेगळ्या धर्माचे असलो, तरी आध्यात्मिकदृष्ट्या आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. माझ्या या भारतीय संस्कृतीला निकचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही ती सांगते.

हेही वाचा: ऑलिम्पियन नीरज चोप्राची Style भाल्यापेक्षा महागडी

प्रियंका पुढे म्हणाली, मी आणि निक आध्यात्मिक मुद्द्यावर समान विचार करत असतो. जेव्हा आपल्या भावना, नातेसंबंध आणि विश्वास यांचा प्रश्न येतो. तेव्हा साहजिकच आपण वेगवेगळ्या समजुतींनी मोठे झालो आहोत, पण 'धर्म' हा फक्त एक नकाशा आहे, हे आपल्याला समजायला हवं. कारण, धर्माच्या नावाखाली कोणतंही नातं जोडलं जात नाही, तर ते विश्वासाच्या जोरावर जोडलं जातं, असंही ती सांगते.

हेही वाचा: खुशखबर! इंडियन आर्मीत NCC भरती; तब्बल 2.50 लाख मिळणार पगार

टॅग्स :priyanka chopranick jonas