esakal | वाढदिवस साजरा करताय? अभिनेत्रीने केलेली चूक तुम्ही करू नका!
sakal

बोलून बातमी शोधा

वाढदिवस साजरा करताय? अभिनेत्रीने केलेली चूक तुम्ही करू नका!

वाढदिवस साजरा करताय? अभिनेत्रीने केलेली चूक तुम्ही करू नका!

sakal_logo
By
शरयू काकडे

वाढदिवस साजरा करायचा म्हणजे मित्र-मैत्रीणी, नातेवाईंकाचा उत्साह, धमाल मज्जा-मस्तीहे सहाजिकचं आहे. वाढदिवस आहे म्हणजे केक तर कापायलाच पाहिजे. केक कापण्यापूर्वी मनातील इच्छा व्यक्त करून पेटवलेल्या मेणबत्यांना फुंकर घालायची. पण वाढदिवसाच्या उत्साहात आपण थोडं भान राखायला हवं नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला क्षणाचा विलंब लागणार नाही. अशाच एका फसलेल्या वाढदिवस सेलिब्रेनशचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हॉलिवूड अभिनेत्री निकोल रिची ही वाढदिवस साजरा करताना थोडक्यात बचावली आहे.

हेही वाचा: १९८८ मध्ये आजच्या दिवशी 70 रुपये वारले...!

नुकताच निकोल रिची हिने आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. मात्र वाढदिवस साजरा करताना जे घडले ते फार अनपेक्षित होते. वाढदिवस साजरा करताना निकोलच्या केसांना आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरलं होत आहे.

हेही वाचा: 'तो' आवाज पुरुषाचाच का? तृप्ती देसाईंना बिगबॉसची अडचण

वाढदिवस साजरा करताना केक कापण्यापूर्वी निकोल मेणबत्यांना फुकंर मारत होती. त्यावेळी तिने केस गळ्यात मोकळे सोडले होते. नेमके मेणबत्यांना फुंकर मारताना एका पेटत्या मेणबत्तीमुळे तिच्या अचानक केसांना आग लागली. आग लागताच निकोलने मोठमोठ्याने आराडाओरडा सुरु केला. तिच्या मित्र-मैत्रिणींनी लगेच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळाला. निकोले हा घटनेचा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्साग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कित्येक सिलेब्रिटींना प्रतिक्रिया दिल्या आहे. निकोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

loading image
go to top