माझी शूटिंगसाठी वापरली जाणारी एक शाल आहे जी ‘मुरांबा’च्या सेटवर अक्षरशः प्रसिद्ध झाली होती. शूटिंगला जाताना बाकी काही घेतलं नाही तरीही ही शाल मात्र माझ्याबरोबर असते. ती फेमस यासाठी आहे कारण शूटिंग दरम्यान आम्हाला जेव्हा विश्रांती घ्यायची वेळ यायची तेव्हा, ‘स्मिता शाल आणलीस का?’ असं विचारलं जायचं.