
नागपूर : सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. महिला यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत असतात. सुंदर दिसण्यासाठी पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगुती उपाय करीत असते. मात्र, प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. त्यानुसारच काळजी घ्यावी लागते. इतर त्वचा प्रकारांच्या मानाने तेलकट त्वचा अधिक संवेदनशील असते. या त्वचेवरच प्रदूषणाचा सर्वांत जास्त प्रभाव पडतो.
उन्हाळ्यात तेलकट चेहऱ्याची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण, उन्हाळ्याच्या दिवसांत तेल आणि घामामुळे तेलकट त्वचा अजून खराब होते. ज्यामुळे ऑइली स्कीनवर ब्लॅकहेड्स, पिंपल्स आणि अन्य त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अशा त्वचेवर मेकअपही टिकत नाही. ज्या व्यक्तीची तेलकट त्वचा असते त्यांनी सतत चेहरा धुतला नाही पाहिजे आणि जर तुम्ही असे करत असाल तर हे अत्यंत धोकादायक आहे.
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग आणि काळवटपणा येतो. तेलकट त्वचेपासून दूर होण्यासाठी वेगवेगळे औषध उपचार देखील घेतले जातात. मात्र, म्हणावे तसे काही फरक दिसून येत नाहीत. तेव्हा तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घ्यायला हवे.
टोनर
तेलकट त्वचेसाठी टोनर वरदान आहे. टोनरमुळे त्वचेवरील उघडी रोमछिद्र बंद होतात. टोनरचा वापर थांबवू नका.
मॉईश्चरायझर
त्वचा तेलकट असली तरी पोषणाची गरज असते. अशा वेळी वॉटरबेस मॉईश्चरायझरचा वापर योग्य ठरतो.
फेस वॉश
त्वचेला अनेक प्रकारच्या अशुद्धींचा सामना करावा लागतो. ते दूर करण्याच्या हेतूने स्वच्छतेच्या कामी फेस वॉश महत्त्वाची भूमिका बजावतो.
सनस्क्रिन
उन्हाची तीव्रता कमी असली तरी बाहेर पडताना सनस्क्रिनचा वापर टाळू नका.
स्क्रबिंग
स्क्रबिंगमुळे त्वचारंध्रांमध्ये आतपर्यंत अडकलेले धुलीकण बाहेर निघतात. मृत पेशी निघून जातात. चेहरा धुण्यासाठी स्क्रबचा वापर करणे योग्य ठरते.
हे करा
योग्य सनस्क्रीनचा वापर करा
एक्सफॉलिएट करा
ब्लॉटिंग शीटचा वापर करा
चेहरा ओव्हरवॉश करू नका
फेसवॉशचा वापर करा
दिवसातून किमान दोनदा चेहरा धुवा
टोनरचा करा वापर
मॉईश्चरायजिंग करा
मधातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक गुण तेलकट त्वचेला फायदेशीर
अंड्यातील पांढरा बलक आणि लिंबू तेलकट त्वचेसाठी उत्तम
कोरफड हा त्वचेच्या कंडीशनिंगसाठी खूप चांगला उपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.