जुन्या कपड्यांना द्या नवा लुक  'या' पाच पद्धतीने 

old clothing new look tips lifestyle marathi news
old clothing new look tips lifestyle marathi news

कोल्हापूर : जुने कपडे आपल्याला अनेक वेळा टाकाऊ वस्तू वाटतात. काही वेळा अत्यंत कवडीमोल किमतीने तुम्ही  हे कपडे देऊन टाकता  अथवा अन्य कारणासाठी वापर करता.. मात्र याच कपड्यांमध्ये एक नवीन लुक आणून याचा वापर आपणास करणे सहज शक्‍य आहे.  जुन्या कपड्यांना नवा लुक देण्यासाठी पाच उपाय आहेत ज्याद्वारे आपण अत्यंत चांगल्या  पद्धतीने  जुन्या कापडाचा वापर करू शकता.

1) आपल्याकडे जुने झालेले टी-शर्ट वापरतच नाही. परंतु हेच टी शर्ट आकर्षक करू शकतो. यासाठी  फॅब्रिक स्टिकर चा वापर करा. प्रिंटेड शर्ट वर सुद्धा हा प्रयोग करू शकता. याशिवाय अन्य शर्ट वर आपण फ्लोरल प्रिंट स्टीकर सुद्धा लावू शकतो. स्टिकर लावण्याची ही एक पद्धत असते. ही पद्धत आपल्याला त्या स्टीकर च्या वेस्टनावरच दिलेली असते. या पद्धतीप्रमाणे आपण जुन्या टी-शर्टला नवा लुक देऊ शकतो. हॉटग्लू चा वापर करून आपण टॉप ला  एक वेगळी डिझाइन करू शकतो. सिक्वेन्स स्टार चा वापर करून त्याला  एक वेगळा लुक देऊ शकतो अथवा आपल्या पसंतीचे कोणतीही डिझाईन अथवा अक्षरे आकर्षक पद्धतीने घेऊ शकतो.

2)  वेगळ्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला त्याच पद्धतीने पेहराव करणे आवश्यक असते. तुम्ही जर आव्हानात्मक क्षेत्रात काम करत असाल तर  टी शर्ट चा वापर या करू शकता. टी-शर्ट च्या मागील बाजूस सामान्य आकारात  चांदणी अथवा गोलाकार डिझाईन तयार करून ते कात्रीच्या साह्याने कापून घ्या. त्यानंतर हेच डिझाईन रेबिन च्या साहाय्याने टी-शर्टवर जोडून घ्या.  हे काम फॅब्रिक टेप च्या माध्यमातून ही करू शकतो यातून टी-शर्टला एक नवा लुक मिळून जातो.

3) तुम्हाला  जर प्लेन टॉप अथवा बॉटम्स वापरून कंटाळा आला असेल तर आपण याचे परिवर्तन प्रिंट मध्ये करू शकता. यासाठी खूप सोपी पद्धत तुम्ही अवलंबू शकता. फॅब्रिक पेंट आणि पेन्सिल इरेझरच्या मदतीने आपण स्टॅम्प लावून पोलका डॉट प्रिंट तयार करू शकतो. फळे आणि भाजीपालाचा उपयोग करून अनेक नक्षीदार डिझाईन तयार करू शकतो. संत्र्याच्या फोडी करून त्याचेही  स्टॅम्पिंग करून ते उन्हामध्ये मध्ये वाळुन घ्यावे. कापलेल्या भेंडीच्या आधारे  स्टार प्रमाणे प्रिंटिंग करू शकता. कांदा कापून त्याचे डिझाइन ही  कापडावर तयार करू  शकतो. डार्क कलरचा आउटलेट आणि सौम्य कलरचे फिंगर प्रिंट्स यामुळे एक वेगळा लूक या कपड्यावर येऊ शकतो.

4)  फिकट रंगाच्या कपड्यांना तुम्ही एक नवा लुक देऊ शकता.  या ठिकाणी एक किंवा अधिक रंग वापरू शकतो. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या फळांचा वापर  नैसर्गिक रंग म्हणून करतात. द्राक्षांचा वापर लाल किंवा गुलाबी रंगा साठी करू शकतो. 

याशिवाय गाजर, संत्री, लिंबू, हळद, पालक, चहा पावडर यांचाही वापर करू शकतो. कोणत्याही फळापासून रंग बनवताना ते चांगल्या पद्धतीने कापून घ्यावेत भांड्यामध्ये फळाच्या दुप्पट पाणी ठेवावे. मध्यम आकाराच्या गॅस वर एक तास ते उकळून घ्यावे त्यानंतर ते थंड करून रंग म्हणून तुम्ही ते वापरू शकता. कापडाला रंग देण्यापूर्वी ते चांगल्या पद्धतीने धुऊन घ्यावेत. 

नैसर्गिक स्रोत असलेले जसे कॉटन, लीनन आणि सिल्क कपड्यावर अशा रंगाचे परिणाम चांगले दिसतात. जर तुम्ही फळांचा रंग वापरणार असाल तर अर्धा कप मिठ आणि आठ कप पाणी घ्यावे. जर भाजीपाल्याचे रंग वापरणार असाल तर त्यामध्ये दोन कप शिल्का आणि आठ कप पाणी घालावे. त्यामध्ये कपडे घालून एक तास ते उकळून घ्यावे त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे. कपडे सुकवण्यासाठी काठीचा वापर करावा .यामधून वेगवेगळ्या रंगाची डिझाईन अथवा एकच रंग पूर्ण कापडला देऊ शकता.

5) पांढऱ्या कपड्यांना स्नो वाइट बनवण्यासाठी बोरिक एसिड चा वापर करू शकतो. कापडावरील डाग आणि अन्य घटक काढून टाकण्यासाठी चार लिटर पाणी आणि 60 ग्रॅम बोरिक पावडर वापरावे. दोन तासानंतर हे कपडे थंड पाण्यामध्ये धुवावे. आपण अशा पद्धतीने जुने कपडे अधिक उठावदार करू शकतो. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com