सावधान! ऑनलाइन डेटिंग करताय? लहानशी चूक पडेल महागात

for online dating take precautions and give tips for that in kolhapur
for online dating take precautions and give tips for that in kolhapur
Updated on

कोल्हापूर : ऑनलाइन डेटिंग हा मजेदार अनुभव असतो परंतु हे पाहायला जितकी सोपं आहे तितक प्रत्यक्षात नाही. डेटिंगचा हा मार्ग थोडा कठीण असू शकतो. आपण कितीही स्वतःला स्मार्ट समजत असू परंतु एक छोटीशी चूक सुद्धा महागात पडू शकते. ऑनलाइन डेटिंगचा तुमचा अनुभव कडवट होऊ नये यासाठी आम्ही तुमच्यासाठी 10 गोष्टींची सूचना तयार केल्या आहेत, ज्याचं अनुकरण तुम्ही ऑनलाइन डेटिंग वेळी करू शकता. 

ऑनलाइन डेटिंग वेळी हे करा..

1. डोकं शांत ठेवून बोलणे

डेटिंगच्या वेळी तुम्हाला डोकं शांत ठेऊन बोलावं लागतं. कारण तुमचं बोलणं आणि भेट ही एक अनोळखी व्यक्ती सोबत होत असते. तर अशा वेळी तुम्ही डोकं शांत ठेऊन खूप काही नवीन शिकू शकता. ऑनलाइन डेटिंग एक मोठ्ठा समुद्राप्रमाणे आहे. इथे हजारो प्रकारची लोक भेटतात. प्राथमिक काही घटकांची सूची तुम्ही बनवली नाहीत तर काही चुकीच्या स्ट्रिकना सामोरे जावे लागेल. यात खूप वेळ घालवण्यापेक्षा नियमांना थोडं रिलॅक्स करावे. त्यामुळं एक चांगला डेट तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर मिळू शकेल.

2. महिलासंबंधीत त्याचे विचार काय आहेत हे विचार 

तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचा डेट बनवत आहे त्‍याचे महिलांच्या विषयी विचार काय आहेत हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. तो फेमिनिस्ट आहे का? किंवा तो महिला आणि तृतीय पथी लोकांच्या अधिकाराच्या बाबतीत जागरूक आहे का? मानवाधिकारांच्या बाबतीत त्याचं काय मत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या नात्यासाठी खूप महत्त्वाची असतात. या प्रश्नांच्या उत्तरांना तुमच्या नात्याला मदत होऊ शकते. 

3. सुरुवातीची भेट पब्लिक प्लेस मध्ये असावी

तुम्ही ज्या व्यक्तीला पसंत केले आहे, तो किती सौम्य, शांत, शालीन आणि संस्कारी असला तरी तुमची पहिली भेट ही सार्वजनिक ठिकाणीच व्हायला हवी. अगर ती व्यक्ती यासाठी तयार नसेल, तर त्याला शांततेत समजवून त्याच्या सोबत जाण्यास नकार द्या. डेटवर जायच्या आधी तुमच्या जवळच्या मित्रांना सांगून जा. आणि त्यांना लोकेशन पाठवून ठेवा. 

4. सरळ सरळ त्याला कारण विचारा

जेव्हा तुम्ही दोघे बोलणे सुरू कराल तेव्हा त्याला ऑनलाईन डेटिंग ॲप का वापरता असे विचारा?  यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कन्फ्युजन राहणार नाही. जर त्याचा उद्देश तुम्हाला योग्य वाटेल तर जे आहे स्पष्ट सांगून टाका. ते तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल.

5. तुमच्या पार्श्वभूमीवर बद्दल स्पष्टता द्या

तुमचे करिअर आणि एज्युकेशनल बॅकग्राउंड याबद्दल काही खोटे सांगू नका. ही एक अशी गोष्ट आहे, जी लपवली जाऊ शकत नाही. तुमचे नाते तुमच्या शिक्षणाने इम्प्रेस होऊन जाते पुढे वाढत असेल तर काही गोष्टी तुम्हालाही कळू शकतात, काही गोष्टी नंतर कळतात आणि पुढे जाऊन या दोन्ही गोष्टी तुमचे नाते तुटण्यास  कारण ठरू शकते. 

ऑनलाइन डेटिंग वेळी हे करू नका

1. प्रोफाइल बद्दल खोटे बोलू नका

ॲपमध्ये तुम्ही कोण आहात याबद्दल स्पष्ट लिहा. अगर तुम्ही कॅज्युअल नात्यासाठी तयार आहात किंवा गंभीर नात्यासाठी तयार आहे, जे आहे ते योग्य लिहा. यामुळे समोरच्याला कोणताही गैरसमज होणार नाही. तुम्हाला तुमचा मॅच व्यक्ति मिळाल्यानंतर बायोमध्ये मेंशन करणे विसरू नका. 

2. खूप जास्त अपेक्षा ठेऊ नका

तुमचा पहिला मॅच तुमच्या सगळ्या प्रयत्नांना उत्तम खडा उतरू शकेल अस नाही. असं होऊ शकतं की परफेक्ट साथीदार शोधण्याच्या प्रयत्नात तीन चार किंवा पाच व्यक्तीने सुद्धा भेटावे लागेल. तुमच्यासाठी योग्य व्यक्तीचा चॉईस करण्यासाठी वेळ लागू शकतो. तर अशावेळी उतावळेपणा आणि गडबड यापासून तुम्ही बचाव केला पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे की हे ऑनलाइन डेटिंग आहे स्पीड डेटिंग नाही.

3. बायो स्किप करू नये

ज्या व्यक्तीमध्ये तुमची आवड निर्माण झाली असेल, सर्वात आधी त्याचा बायो वाचा. एखाद दुसरा फोटो बघून स्वाईप करून लेफ्ट लाईट करुन बघा. कारण आम्ही जाणतो की एक फोटो हजार शब्दांमध्ये बोलतो. पर्यंत शब्दांनाही आपलं महत्त्व असतं. बायो वाचल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल चांगला अंदाज येईल.

5. सावधान रहा पण जास्त नको

बऱ्याच वेळा मुली डेटिंगवेळी इतक्या सावध असतात की त्या सहज राहत नाही. याचा परिणाम असा होतो की, समोरच्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज देऊ जातो. अशा वेळी आपण सहज राहिल पाहिजे, कॉम्प्लिमेंट देत, हसत, त्याच्या नजरेला समजून घेतल पाहिजे. आम्ही तुम्हाला फेक बनण्यासाठी बोलत नाही, परंतु जे जेन्युअन आहे त्या गोष्टीच कौतुक केलं पाहिजे, फक्त उगाच असंच कौतुक करण्यात काहीही अर्थ नाही

5. जास्त वेगळी आणि पर्सनल फोटो पाठवू नये

डेटिंग नंतर काही दिवसात मुली लगेच सहज होऊन जातात. यावेळी समोरच्याला इम्प्रेस करण्याच्या नादात आशा काही गोष्टी घेडून जातात की त्यांचा काहीच उपयोग नसतो. भलेही तुम्ही डेटमुळे कनेक्ट फील करत असाल समोरचा व्यक्ती ही तुम्हाला उत्तम जेंटल वाटत असेल, परंतु चुकून सुद्धा तुमचे वेगळे न्यूड असे फोटो किंवा व्हिडीओ पाठवू का? असा विचार करू नका काय माहिती तुमचे फोटो चुकीच्या हातात ही पडू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com