Health: सावधान! तुम्ही किटलीमध्ये चहा नाही तर कॅन्सर उकळवत आहात

अति उकळेला चहा पिणं म्हणजे घातक आजाराला निमंत्रण देण.
  over boiled tea very harmful health How To Make Healthy Tea
over boiled tea very harmful health How To Make Healthy Tea

चहाचे चाहते जगभरात पाहायला मिळतात. पण भारतात चहाविषयीचं प्रेम जरा जास्तच आहे. तुम्ही चहाला भारतीयांच राष्ट्रिय पेय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तासंतास अभ्यास करणारे विद्यार्थी, ऑफिसमधील कर्मचारी आणि रोजनदारीने काम करणारे कामगार कोणीही असले तरी प्रत्येकाला आळस घालवण्यासाठी चहाची चुसकी पुरेशी ठरते.

चहाच्या टपरीवर नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. भारतात एमबीए चायबाला, ग्रॅज्युएट चायवाली अशा विविध नावांनी चहाची टपरी टाकण्यात आली आहे. चहाच्या टपरीवर चहा विकून अनेकांनी आजवर लाखो रुपये कमवले आहेत. फक्त चहा विकून अनेकांचं नशीब फळफळलं आहे.

  over boiled tea very harmful health How To Make Healthy Tea
Health Benefits of Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट ठेवते मधुमेह, कर्करोग, संधिवात, दमा या आजारांना दूर... वाचा एका क्लिकवर

हा सर्वांचा आवडता चहा पिण्याच्या अनेकांच्या सवयी वेगळ्या आहेत. काही जणांना थंड चहा प्यायला आवडतो. तर काहींना अती उकळलेला कडक चहा पिण्याची आवड असते. पण तुम्हाला माहितीय का? हा असा अति उकळेला चहा पिणं म्हणजे घातक आजाराला निमंत्रण देण.

अति उकळेला चहा पिल्यावर कॅन्सरला मिळते निमंत्रण

आहारतज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, जर चहा योग्य प्रकारे तयार केला असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत. पण चहा अतिप्रमाणात उकळलेला असेल तर ते आरोग्यासाठी घातक आहे.

चहा पावडर, साखर घालून खूप उकळणं आणि नंतर दूध घालून चहा खूप उकळणं ही चुकीची पध्दत असल्याचं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. दूध घातलेला चहा जास्त उकळला तर त्याचं विष तयार होतं.

  over boiled tea very harmful health How To Make Healthy Tea
Monsoon Health Care : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' काढा..., जाणून घ्या याचे अनेक फायदे

चहाच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, पॉलिफेनॉल, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, कॅल्शियम आणि फ्लोराईड यांसारखी आवश्यक पोषक आणि खनिजे आढळतात. पण तज्ज्ञांचे असे मत आहे की, जास्त उकळल्याने चहा आणि दुधामधील कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि सी यांसारखे पोषक घटक कमी होतात.

तसेच, जास्त वेळ दुधाचा चहा उकळल्यामुळे कर्करोगजन्य पदार्थ ऍक्रिलामाइड तयार होऊन कर्करोगाचा धोका वाढतो. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

दुधाचा चहा जास्त वेळ उकल्यानंतर त्यात टॅनिनचे प्रमाण वाढत जाते, ज्यामुळे शरीरातील पोषक तत्वांचे शोषण करण्यास अडथळा येतो. टॅनिनचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्तसंबंधित आजार किंवा ॲनिमिया हा होण्याची शक्यता असते.

  over boiled tea very harmful health How To Make Healthy Tea
Liver Health : फॅटी लिव्हरचा धोका टाळण्यासाठी तुमच्या आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

हेल्दी चहा कसा बनवायचा?

एक कप चहा हवा असल्यास भांड्यामध्ये एक कप पाणी घालावं. ते उकळून घ्यावं. पाण्याला उकळी आली की त्यात चहा पावडर घालावी. चहा पावडर पाण्यात चांगली उकळू द्यावी. याप्रकारे पाणी उकळल्यास चहाला रंग आणि वास दोन्हीही छान येतं. पाण्यात चहा पावडर चांगली उकळली गेली की त्यात दूध घालावं. चहात दूध घातल्यानंतर चहा आणखी पुढे तीन मिनिटं उकळू द्यावा. तर झाला तुमचा हेल्दी चहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com