निराशेला कवटाळून बसण्याऐवजी संयम आणि समजूतदारपणाने जीवनात साधता येते प्रगती

Life Progress After Overcoming Despair: निराशेला कवटाळून न बसता संयम आणि समजूतदारपणाने जीवनात प्रगती साधता येते.
Overcoming Despair with Patience and Wisdom |Life Progress

Overcoming Despair with Patience and Wisdom |Life Progress

sakal

Updated on

बहुतेक जण आशावादी असतात; पण काहींना सतत निराशेने वेढलेले असते. मनानेच निर्माण केलेल्या आशा आणि निराशा या दोन अवस्थांकडे तटस्थपणे आणि पुरेशा समजूतदारपणे पाहायला शिकले पाहिजे. आशा मनाला उभारी देते; तर निराशा त्याला खोल गर्तेत लोटते. आशा कृतीला प्रवृत्त करते; तर निराशा निष्क्रिय बनवते. आशा म्हणजे उद्दिष्टाकडे केलेला सकारात्मक प्रवास आणि निराशा म्हणजे शून्यात घेतलेली उडी.

आशा-निराशेचा खेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात सुरू असतो. आशेबरोबर ऊर्जा असते; म्हणूनच तिच्यात चैतन्य असते. निराशा म्हणजे ऊर्जाहीनता, आळस. तेथे तमाचे राज्य असते. अपेक्षित घडले नाही, की निराशा तिचे जाळे फेकते आणि आपण त्यात अडकतो. या "अनपेक्षिता'ची शक्‍याशक्‍यता, तारतम्य लक्षात घेणे, म्हणजेच निराशेपासून दूर राहणे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com