Parental expectations and academic pressure are pushing children away from outdoor play, affecting their mental and emotional well-being.
sakal
Are Parents Sacrificing Children’s Playtime for Academic Dreams: आधुनिक जीवनशैलीत मुलांना मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेमचे व्यसन लागले आहे. त्यामुळे ही मुले मैदानी खेळापासून कोसो दूर गेली आहेत. अशातच पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवत आहेत. त्यामुळे मुलांच्या मनावर मानसिक ताण येतो. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी पालकांकडून सतत अभ्यासाचा आग्रह धरला जात असल्यामुळे, त्यांच्या कोवळ्या मनावर अपेक्षांचे ओझे पडले आहे. याच ओझ्याखाली मुलांना खेळण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना मैदानी खेळाचा विसर पडला आहे.