esakal | आई-वडिलांच्या भांडणाचा मुलांवर होतो मोठा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

भांडण

आई-वडिलांच्या भांडणाचे मुलांवर काय होतात परिणाम? जाणून घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : मुलांच भावविश्व एखाद्या शांत जलाशयासारखे असते. ज्यात आजूबाजूच्या सृष्टीचे प्रतिबिंब पडत असते. एका छोट्याशा दगडानेही त्यावर तरंग उठतात. तसेच मुलांचाही असते. थोड्याशा ताणानेही त्यांच्या भावसृष्टीत खळबळ माजते, तरंग उठतात. मग मनाचा खोल डोह ढवळून निघतो. तिथली शांतता भंग पावते. मनात उलथापालथ होते.

आई-वडिलांचे संबंध सामान्य नसलेल्या घरातली मुलं (०-१२ वर्षांची) खूप अस्वस्थ, केविलवाणी होऊन जातात. मुलांच्या कोवळ्या वयात त्यांना आई-वडिलांची भावनिक जवळीक, त्यांची माया, भरपूर वेळ आणि घरामधले आनंदी वातावरण एवढंच हवे असते. कारण, याच वयातच त्यांची भावनिक, बौद्धिक, शारीरिक वाढ तसेच व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. जर पोषक वातावरण मिळाले नाही तर ही मुलं अकालीच कोमेजून जातात.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

आई-वडिलांच्या भांडणाचा मुलांवर वाईट परिणाम होतो. ज्या वयात आनंदी राहायचे, खेळायचे, बागडायचे त्याच वयात त्यांच्यावर मानसिक ताण येतो. सतत भांडत असलेले आई-वडील, त्यांच्यात असलेला अबोला, घरातले बिघडलेले वातावरण यामुळे मुलांच्या सर्वांगीण वाढीस अडथळा येतो. एकमेकांची उणीदुणी काढत असलेले, एकमेकांवर जोरजोरात ओरडणारे आई-वडील बघून या मुलांच्या मनात एक प्रकारची धास्ती बसते. ते सतत भीतीच्या सावटाखाली वावरत राहतात. एक प्रकारची असुरक्षितता त्यांच्या मनात निर्माण होते.

मुलं घरातल्या मोठ्यांचे अनुकरण करत असतात. त्यातूनच शिकतात. लहानपणापासूनच ते नात्यांमधला गोडवा, एकमेकांकरता असलेली काळजी, प्रेम बघत असतील तर नात्यांमधला बळकटपणा त्यांच्या मनात रुजत जातो. मग ही मुलं भविष्यात सुदृढ नात‌ बनवू शकतात. त्यामुळे आपल्याला फुलांना जपायला हवे, त्यांना फुलवायला हवे, तरच सर्वांच्या आयुष्यात आनंदाचा व समाधानाचा बहर येईल.

हेही वाचा: चुलत जावांचा शॉक लागून मृत्यू; भेटीसाठी गेली अन् गमावला जीव

विविध ताणामुळे समस्यांची निर्मिती

 • मुलांची झोप कमी होते. ते शांत झोपूच शकत नाही

 • दहा अकरा वर्षांची मुलंसुद्धा अंथरूण ओल करतात

 • शाळेत, अभ्यासात त्यांचे लक्ष एकाग्र होत नाही

 • मुलं उदास राहू लागतात

 • एकलकोंडी व्हायला लागतात

 • मित्र-मैत्रिणींपासून तुटत जातात

 • नैराश्याने ग्रासली जातात

नात्यांवरचा विश्वास उडतो

 • मुलं भविष्यात नातं बनवायला घाबरतात किंवा नात्यांबाबतीत नकारात्मकता निर्माण होते

 • बहुतांश वेळा मुलं भविष्यात नात्यांमध्ये पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाहीत

 • लहानपणापासून मनात घर करून बसलेली भीती, असुरक्षितता वाढते

 • मुलांना स्वतःच्या कोषात रहायला आवडते

 • मुलं घुमी होतात, स्वतःला व्यक्त करायला घाबरतात

 • मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलू शकत नाही

 • आत्मविश्वासाचा अभाव दिसतो

 • मुलं न्यूनगंडाने पछाडल्या जातात

 • काही केसेसमध्ये मुलं आक्रमक होतात

 • मुलं एखादा गुन्हा करायलाही मागे पुढे पहात नाही

काय करावे?

 • आई-वडिलांनी शक्यतो आपापसातले वादविवाद परस्पर सामंजस्याने मिटवावेत

 • मुलांच्या चांगल्यासाठी दोघांनीही थोडी माघार घ्यावी

 • आपापले अहंकार बाजूला ठेवावे

 • मुलांसमोर भांडणं टाळा

 • घटस्फोटाचा निर्णय घेताना मुलांना विश्वासात घ्या

loading image
go to top