esakal | मुलांसमोर पालकांनी 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नयेत, अन्यथा होईल मोठं नुकसान I Relationship
sakal

बोलून बातमी शोधा

Kids

मुलं मोठी होत राहतील, परंतु पालक नेहमीच त्यांच्यासाठी आदर्श असतात. पालकांनी आपल्या मुलांसाठी नेहमीच चांगलं उदाहरण ठेवणं महत्वाचं आहे.

मुलांसमोर पालकांनी 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नयेत

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पालक योग्य गोष्टी शिकवतात, पण.. - मुलं त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या पालकांसोबत घरी घालवतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकतात. चांगले किंवा वाईट पालक त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीचं उदाहरण आहे. पालक आपलं संपूर्ण आयुष्य मुलांना योग्य गोष्टी शिकवण्यात घालवतात, पण नकळत ते मुलांना काही वाईट गोष्टीही शिकवतात. ज्याचा मुलांवर खूप नकारात्मक परिणाम होतो. जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी आहेत, ज्याचा मुलांवर मानसिक परिणाम होतो..

..तर मुलं स्वतःला दोष देऊ लागतील - जर तुमचे मुल तुम्हाला दररोज वाद घालताना किंवा घरात वारंवार भांडताना पाहत असेल, तर त्याचं वर्तन आपोआप हिंसक होईल. घरात होणारी मारामारी पाहून मुलं स्वतःला कुठेतरी दोष देऊ लागतील. जरी पालकांनी आपापसात एखाद्या गोष्टीबद्दल वाद घातला असेल, तर तो वाद मुलांसमोर चांगल्या पध्दतीनं सोडवण्याचा प्रयत्न करावा. यातून मुलाला कळेल, की न लढताही शांततेनं बोलून कोणतीही बाब सोडवता येते.

हेही वाचा: Pregnancy मध्ये सुके खोबरे खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

मुलं ड्रग्सच्या आहारी जातील - घरात कोणत्याही प्रकारची हिंसा मुलाचं आयुष्य कायमचं खराब करू शकते. कोणत्याही प्रकारची हिंसा, अपमानास्पद असो किंवा शारीरिक मानसिकदृष्ट्या मुलांवर खूप परिणामकारक ठरते. मुलं आधी त्यांच्या पालकांकडून गैरवर्तन करायला शिकतात. त्यामुळं मुलं मोठी झाल्यावर ड्रग्स किंवा अल्कोहोलच्या आहारीही जाऊ शकतात.

कठोर शिस्त - पालक आपल्या मुलांना शिस्त कशी शिकवतात, याचा मुलांच्या वागण्यावरही परिणाम होतो. जेव्हा पालक जबरदस्तीनं मुलावर दबाव टाकतात, तेव्हा मुलाचं वर्तन बदलू लागतं आणि तो हळूहळू त्याच्या पालकांपासून दूर जाऊ लागतो. कडक शिस्तीखाली मुलं अनेकदा आक्रमक होतात आणि याचा त्यांच्या मनावरही नकारात्मक परिणाम होतो.

हेही वाचा: पुरूषांच्या 'या' 7 वाईट सवयी महिलांना अजिबात आवडतं नाही

मुलांचं सामाजिक कौशल्य बिघडतं - शिकागो विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही समाजविरोधी पालक असाल, तर तुमच्या मुलांनाही वाईट सवय लागण्याची शक्यता आहे. मुलं पालकांच्या त्याच सवयी स्वीकारतात आणि त्यांच्या असामाजिक असण्याचाही मुलांवर समान परिणाम होतो. यामुळं मुलांचं सामाजिक कौशल्य बिघडतं आणि ते कोणाशीही एकसंघ बनू शकत नाहीत.

मुलं दबाव हाताळू शकणार नाहीत - पालक कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक दबाव कसा घेतात, ही मुलं त्यांच्याकडून चांगलं शिकतात. जर तुम्ही खूप लवकर अस्वस्थ व्हाल आणि बऱ्याचदा तणावाखाली असाल, तर तुमचं मूल सुद्धा कोणत्याही प्रकारचा दबाव हाताळू शकणार नाही. अशा स्थितीत तो तुम्हाला असे करताना पाहतो, असं वागेल. रागाच्या भरात ओरडणं, उद्धटपणे बोलणं आणि गोष्टी मोडणं जसं मुलं त्यांच्या पालकांकडून शिकतात.

हेही वाचा: मित्र-मैत्रिणींसोबत लव्ह सिक्रेट शेअर करताय? 'ही' घ्या काळजी

मुलं मोठी होत राहतील, परंतु पालक नेहमीच त्यांच्यासाठी आदर्श असतात. पालकांनी आपल्या मुलांसाठी नेहमीच चांगलं उदाहरण ठेवणं महत्वाचं आहे. तुमच्या काही वाईट सवयी मुलाचं आयुष्य कायमचं खराब करू शकतात. आपल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी लावा आणि चांगले पालक बनण्याचा प्रयत्न करा..

loading image
go to top