

Stop Over-Parenting! Time for 'Lazy Parenting'
esakal
Time for 'Lazy Parenting: पालकांनी मुलांची प्रत्येक लहान-मोठी समस्या स्वतः सोडवण्याची सवय सोडली पाहिजे. मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ देण्यासाठी 'लेझी पेरेंटिंग' ही संकल्पना सध्या काळाची गरज बनत चालली आहे. शाळेचा प्रोजेक्ट असो किंवा मित्रांमधील भांडण, आजकाल अनेक पालक मुलांच्या प्रत्येक अडचणीत लगेच धावून जातात. पालकांची हीच अति-काळजी मुलांचे नुकसान करत आहे. यामुळे मुले आव्हानांना सामोरे जाण्यास आणि आत्मनिर्भर बनण्यास मागे पडत आहेत. पेरेंटिंग इन्फ्लुएन्सरच्या मते, पालकांनी आता थोडे 'आळशी' म्हणजेच 'लेझी पेरेंटिंग'चा अवलंब करण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ मुलांकडे दुर्लक्ष करणे असा नसून, त्यांना स्वतःच्या चुकांतून शिकण्याची संधी देणे असा आहे.