बाळाच्या खाण्याची भांडी 'अशी' करा साफ, इंन्फेक्शन होणार नाही

baby bottle
baby bottle

Parenting Tips: प्रत्येक जोडप्याला आई-वडिल( (Parents) होणे हा खूप सुंदर आणि सुखद अनुभव आहे. पण, नुकतेच आई-वडिल झालेल्या जोडप्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. मुलांच्या आरोग्यासाठी (Baby’s Health)त्याचे खाणे-पिणे आणि त्याच्या राहणीमानाची काळजी घेणे आई-वडिलांची पहिली जबाबदारी असते. बाळ जोपर्यंत सहा माहिन्याचे होत नाही तोपर्यत त्याच्या खाण्या पिण्याची चिंता कमी असते पण जसे बाळ आईच्या दुधाशिवाय इतर पदार्थ खायला सुरूवात करतात तेव्हा त्याच्या आरोग्यासंबधीत काही विषय अडचणी वाढवतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे , ज्या भांड्यामध्ये बाळांना अन्न दिले जाते ते व्यवस्थित साफ केले जाते की नाही, किंवा त्यांना कसे साफ करावे? या सर्व गोष्टींची माहिती असणे आई-वडिल दोघांसाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे बाळाचे आरोग्य खराब होत नाही. (Parenting Tips how to Clean Baby's bottle and Bowl To Avoid Infection)

स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही म्हणजे, आरोग्य आणि स्वच्छता नेहमी एकत्र असतात. औषध घेण्यापेक्षा आपण स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

baby bottle
व्हॉट्सअ‍ॅपवरून हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकानं आणि व्यवसाय शोधता येणार?

बाळाच्या खाण्याची भांडी 'अशी' करा साफ

सर्वात आधी भांड्याना (बेबी बॉटल/बाऊल) वॉशने (लिक्विड क्लींजर) किंवा डिश वॉशिंग बार/ लिक्विडने साफ करा आणि नंतर व्यवस्थित धुवून घ्या.

एका पॅनमध्ये भांडी व्यवस्थित बुडेपर्यंत पाणी घ्या आणि पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवा.

बाळांला दुध पिण्याच्या भांड्यामुळे संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. कारण त्याची बॉटल पॅक असते आणि ती साफ करणे थोडे अवघड असते. त्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे बॉटलचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ती गरम पाण्यात उकाळा. लक्षात ठेवा, तुम्हाला बाळाला दुध पाजायचे आहे त्या बॉटलला उकळत्या पाण्यात व्यवस्थित साफ करून घ्या. ही प्रक्रिया तोपर्यंत करत राहा जोपर्यंत बाळ एक वर्षांचे होत नाही.

तुम्हाला फक्त अति संवेदनशील लहान बाळांसाठी अधिक काळजी घ्यावी लागेल. ४-६ महिन्यांच्या बाळांना तुम्ही प्रवास दरम्यान बाहेरील भांड्याचे निर्जंतुकीकरण करून वापरा. चांदीच्या भांड्यांना निर्जंतुकीकरण आवश्यकता नाही कारण चांदी हे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत.

baby bottle
Bitcoin मुळे अब्जाधीश झालेला म्हणतोय ‘बोरिंग है अमीर बनना’

मिक्सरची भांडी देखील करा स्वच्छ

जेव्हा तुम्ही बेबी फूड मिक्सरमध्ये वाटून घेता (ब्लेंड) तेव्हा मिक्सरचे भांडे व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. तुम्हाला मिक्सरचे भांडे साफ दिसत असेल पण त्यामध्ये न दिसणारी घाण साचलेली असते. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी घ्या.ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो चालू करा. तुम्हाल दिसेल की पाणी घाण झाल्याचे दिसेल. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा जोपर्यंत पाणी साफ दिसत नाही. त्यानंतरच त्यात बेबी फुड टाका.

इंन्फेकशेन झाल्यास काय करा

जर बाळाची भांडी साफ नाही झाली तर त्यांना वेगवेगळ्या आजार होतात, जसे की, जुलाब, घशात खवखव, उल्टी आणि कधी कधी संक्रमण तापापर्यंत पोहचू शकते.

baby bottle
वय वर्ष दोन, सिगारेट ओढायचा 40; व्यसन सुटताच बदललं रूप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com