WHATSAPP NEW FEATURE UPDATE
WHATSAPP NEW FEATURE UPDATEESAKAL

व्हॉट्सअ‍ॅपवरून हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकानं आणि व्यवसाय शोधता येणार?

WhatsApp Business Nearby : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) एक नवीन वैशिष्ट्य जाहीर करण्याची योजना आखत आहे.

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) एक नवीन वैशिष्ट्य जाहीर करण्याची योजना आखत आहे. त्यामाध्यमातून युजर्सना त्यांच्या जवळपासचे व्यवसाय शोधण्याची परवानगी देईल. हे वैशिष्ट्य साओ पाउलोमधील (Sao Paulo) काही लोकांसाठी आणले गेले आहे आणि भविष्यात ते अधिक लोकांसाठी आणले जाईल, असे व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर, WABetaInfo यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस नियरबाय (Business Nearby):

WABetaInfo नुसार, हे नवीन वैशिष्ट्य iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. WhatsApp वापरकर्ते हॉटेल, रेस्टॉरंट, किराणा किंवा कपड्यांची दुकाने किंवा जवळपासचा कोणताही व्यवसाय शोधू शकतील. “जेव्हा तुम्ही WhatsApp मध्ये काहीतरी शोधता, तेव्हा बिझनेस नियरबाय (business nearby) नावाचा एक नवीन विभाग असेल. तुम्ही श्रेणी निवडल्यावर तुमच्या आवडीनुसार व्यवसाय खात्यांचे निकाल फिल्टर केले जातील,” असं WABetaInfo ने नमूद केले.

 WHATSAPP NEW FEATURE UPDATE
अलर्ट! व्हॉट्सअ‍ॅप वर सुरु आहे ‘फ्रेंड इन नीड’ स्कॅम; वाचा सविस्तर

हे वैशिष्ट्य अद्याप सर्वांसाठी नाही, परंतु जे लोक आधीच व्यवसाय निर्देशिका (Business Directory) वापरू शकतात त्यांच्यासाठी ते भविष्यातील अपडेटमध्ये उपलब्ध होईल. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड उपकरणांसाठी नवीन इन-अ‍ॅप कॅमेरा इंटरफेसची (in-app camera interface) चाचणी करत आहे. नवीन इंटरफेस अ‍ॅक्शनमध्ये असताना कॅमेरा कसा दिसतो आणि वापरकर्त्यांना ते काय कॅप्चर करत आहेत ते स्पष्ट पाहण्याची परवानगी मिळते.

या महिन्याच्या सुरुवातीला, व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉईस मेसेजसाठी एक नवीन फीचर देखील जाहीर केले आहे. याद्वारे वापरकर्त्यांना मॅसेज पाठवण्यापूर्वी व्हॉईस संदेश ऐकता येतात.

 WHATSAPP NEW FEATURE UPDATE
फोन व नंबर बदलल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप होणार नाही डिलीट, जाणून घ्या

एवढेच नाही तर कंपनी आता अज्ञात संपर्कांना वापरकर्त्याचे शेवटचे पाहिलेले (last Seen) आणि ऑनलाइन स्टेटस (online status) पाहण्यापासून रोखत आहे. व्हॉट्सअ‍ॅप आधीपासूनच वापरकर्त्यांना त्याचं Last Seen आणि ऑनलाइन तपशील (online details) लपविण्याचा (Hide) पर्याय देते परंतु तरीही काही थर्ड पार्टी अ‍ॅप्स आहेत जे तुमच्या क्रियाकलापांचे (Activity) निरीक्षण करू शकतात आणि नवीन गोपनीयता उपाय त्यांना प्रतिबंधित करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. याव्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप त्यांचे चॅट बबल पुन्हा डिझाइन करू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com