Parenting Tips: उन्हाळ्यात मुलांच्या आहारावर ठेवा लक्ष! फॉलो करा या टिप्स

उन्हाळ्यात मुलांना संतुलित आहाराची गरज असते.
Best Diet Plan For Children in Summer, Healthy Summer Foods for Children
Best Diet Plan For Children in Summer, Healthy Summer Foods for Childrensakal

Best Diet Plan For Children in Summer: दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशावेळी मुलांना सकस आहाराची नितांत गरज असते. शरीरामध्ये पोषक घटकांची मात्रा योग्य राहिली तर अभ्यास, श्रम आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण राखण्यास मदत होते. एवढेच नाही तर, संतुलित आहाराने मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास झपाट्याने होतो. मुलांचा संतुलित आहार कसा असावा? या बद्दल आज जाणून घेऊया. (Healthy Summer Foods for Children)

जेवणात भाज्यांचे महत्त्व-

  • मुलांच्या जेवणामध्ये ५० टक्के पालेभाज्यांचा समावेश असावा.

  • पालेभाज्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्याचे काम करतात.

  • पालेभाज्या खाल्ल्याने उष्णतेचे त्रास आणि डिहायड्रेशन होत नाही.

  • भाज्यांमध्ये खनिजे, क्षार आणि प्रथिने आणि सोबतच व्हिटॅमिन

  • देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात.

  • शरीराचा पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन मर्यादित ठेवतात.

Best Diet Plan For Children in Summer, Healthy Summer Foods for Children
Diet Tips: या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्याने मुलांना येऊ शकतो लठ्ठपणा

जेवणात २५ टक्के कडधान्याचे असावे प्रमाण-

  • कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन, विटॅमिन, मिनरल आणि कार्बोहायड्रेट असतात.

  • पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

  • शरीर सुदृढ आणि निरोगी राहातं.

  • शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते

हेल्दी थाळी

  • जेवणामध्ये २५ टक्के दुग्धजन्य व मांसयुक्त पदार्थ असावेत.

  • या पदार्थांपासून शरीरास उपयोगी प्रोटिन्स मिळतात.

  • प्रोटिन स्नायू, त्वचा आणि हार्मोन्सना वाढविण्याचे काम करतात.

  • प्रोटिनने शरीराला झटपट ऊर्जा मिळते.

  • हाडं मजबूत मजबूत होतात.

  • हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात.

Best Diet Plan For Children in Summer, Healthy Summer Foods for Children
Summer Care: उन्हाळ्यात जास्त फिट्ट कपडे घालाल तर होईल हे नुकसान; जाणून घ्या

समर सिजनमध्ये पाणी भरपूर प्रमाणात मुलांना द्यावे तसेच वॉटर रिच प्रोडक्ट, फुट, वेजिटेबल, मोड आलेले कडधान्यांचा वापर मुलांच्या आहारात करावा. वॉटर रिच फुट, पना, कोकम लिंबू पानी द्यावे पिज्जा, बर्गर, जंक फुड देणे टाळावे.

-विशाल गाजिमवार, बालरोग तज्ञ मेडिकल नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com