Parenting Tips | मुलांचा हट्ट पुरवा, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parenting Tips

मुलांच्या शिस्तीपासून ते त्यांच्या वागणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर संस्कार आणि वातावरणाचा परिणाम होतो.

Parenting Tips | मुलांचा हट्ट पुरवा, पण...

मुलांचे संगोपन करणे म्हणजे सुरवातीलाच पालकांना काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. पालक होण्यापूर्वी, आपण पालकत्वाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत. मुलांच्या शिस्तीपासून ते त्यांच्या वागणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर संस्कार आणि वातावरणाचा परिणाम होतो. काही पालक असेही असतात जे मुलांना पूर्ण स्वातंत्र्याने वाढवतात आणि ते जे काही सांगतील ते ऐकतात. मुलांच्या संगोपनाच्या वेळी पालकांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते, परंतु काहीवेळी मुलांच्या प्रत्येक गोष्टीला 'हो' म्हणण्याची गरज नाहीयेय. मुलांबद्दल सर्वकाही गोष्टी ऐकणे किंवा हो म्हणणे यामुळे त्यांच्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात, जे भविष्यात तुमच्यासाठी आणि मुलासाठी हानिकारक असू शकतात.

अनेक तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, मुलांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला हो किंवा नाही म्हणण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही ही आहेत. मुलांच्या संगोपनामध्ये त्यांच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणणे किंवा प्रत्येक गोष्ट नाकारणे हे देखील नकारात्मक असू शकते. त्याच प्रमाणे जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्व गोष्टी ऐकत असाल तर त्याचे काही नुकसान देखील आहेत.

हेही वाचा: 'सिंगल फादर्स' मुलाचं संगोपन करताना घ्या 'ही' काळजी

- अनेकवेळा असे घडते की, पालक मुलांची प्रत्येक मागणी मान्य करतात, असे केल्याने तुमच्या मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

- आजच्या काळात मुले लहानपणापासूनच व्हिडीओ गेम्स आणि मोबाईल फोन वापरायला लागले आहेत. अशा परिस्थितीत, पालकांनी त्यांचा मोबाईल फोनच्या वापरास किंवा व्हिडिओ गेमशी संबंधित प्रत्येक मागणीला हो म्हणणे योग्य नाहीयेय.

- मुलं काही वेळा खाण्यापिण्याचा हट्ट करतात. खरे तर मुलांचा आहार अतिशय संतुलित आणि पौष्टिक असावा. म्हणूनच मुलांनी जेवणाशी संबंधित काही आग्रह केला तर त्याला प्रत्येकवेळी हो म्हणणे हे योग्य नाही. जर तुमच्या मुलाने एखाद्या गोष्टीचा आग्रह धरला तर त्याला हो म्हणण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे विचारात घेतले पाहिजेत.

- मुलांचा घराबाहेर खेळण्याचा प्रत्येक हट्ट मान्य करणंही ते योग्य नाहीयेय. जर तुमचे मूल नेहमी बाहेर जाण्याचा हट्ट करत असेल तर त्याच्याशी पू्र्ण बोलणं झाल्यानंतरच हो म्हणा.

- मुलेही पालकांसोबत खेळात भाग घेण्याचा आग्रह धरतात. जर तुमचा मुलगा अभ्यास करत असेल आणि अशा परिस्थितीत तो तुमच्याकडे अभ्यास करण्याऐवजी खेळासाठी वेळ मागत असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्याशी बोलले पाहिजे.

हेही वाचा: लहान मुलांना नेलपॉलिश लावताय? जाणून घ्या, असे करणे किती सुरक्षित

मुलांबद्दलच्या प्रत्येक गोष्टीला 'हो' म्हणण्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

- मुलांची प्रत्येक मागणी मान्य करणे किंवा प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे याला 'येस पॅरेंटिंग' म्हणतात.

- येस पॅरेंटिंग अनेक प्रकारे खूप फायदेशीर आहे, परंतु त्याचे काही नकारात्मक परिणाम देखील आहेत.

- मुलाला कोणत्याही गोष्टीसाठी न थांबवणे भविष्यात त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते.

- मुलांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणे धोकादायक आहे, परंतु ते जे काही बोलतात ते स्वीकारल्याने देखील त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.

- मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांना शिस्तबद्ध ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वासासाठी प्रत्येक वेळी विचारपूर्वक होय किंवा नाही म्हणावे.

loading image
go to top