Force Feeding : तुम्हीही मुलांना जबरदस्ती खाऊ घालता का? वेळीच बदला सवय

जर तुम्ही मुलांना जबरदस्तीने खायला घालण्याचा प्रयत्न केला तर जेवण मुलांसाठी एक तणावपूर्ण काम होईल.
Force Feeding
Force Feedingsakal
Updated on

मुलांच्या विकासासाठी त्यांना पोषक आहार देणे आवश्यक आहे. त्यासाठी फळे, भाज्या, अंडी, दूध यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. पण अनेक पालकांसमोर एक समस्या आहे की त्यांच्या मुलांना खायचे नाही आणि आरोग्यदायी पदार्थ खाण्यापासून दूर पळतात.

अशा परिस्थितीत, अनेक पालकांना फोर्स फीडिंगच्या मदतीने त्यांना आहार द्यावासा वाटतो. पण आम्ही तुम्हाला सांगतो की चाइल्ड फीडिंग गाइडनुसार तुमची ही पद्धत मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

जेव्हा आपण बाळाला जबरदस्तीने खाऊ घालतो किंवा जास्त आहार देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो. एवढेच नाही तर त्यांची खाण्यातली आवडही संपुष्टात येऊ लागते. त्यामुळे जास्त प्रमाणात आहार देणे किंवा जबरदस्तीने आहार देणे किती हानिकारक असू शकते हे जाणून घेऊया.

Force Feeding
Skin Care: चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या वैज्ञानिक कारण

बाळाला जबरदस्तीने आहार दिल्याचे दुष्परिणाम

स्वारस्य गमावणे

जर तुम्ही मुलाला त्याच्या भुकेपेक्षा जास्त खायला घालण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामुळे त्याची अन्नातील आवड संपते. एवढेच नाही तर जेवणाबाबत नकारात्मक भावनाही मुलाच्या मनात घर करते.

भूक न लागणे

पोट भरलेले असतानाही जर तुम्ही बाळाला जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न केला किंवा दबाव आणला तर ते मानसिकदृष्ट्या त्यांची भूक संपते.

Force Feeding
Health Tips: हे ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ल्याने होतात अधिक फायदे; कोलेस्ट्रॉल होईल दूर

वजन वाढणे

जर तुम्ही पोट भरल्यानंतरही मुलांना खाण्यासाठी ब्लॅक मेल करत असाल किंवा त्यांच्या तोंडात अन्न टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा येऊ शकतो आणि ते जाड होऊ शकतात.

पचन समस्या

जर तुम्ही जबरदस्तीने मुलाला अन्न दिले तर त्याचा त्यांच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ते चघळत नाहीत आणि थेट गिळतात. त्यामुळे पचनसंस्था नीट कार्य करू शकत नाही.

जर मूल खात नसेल तर हे काम करा

  • मुलाला का खायचे नाही याकडे लक्ष द्या.

  • स्वतःला मुलाच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • त्याला त्याच्या भुकेपेक्षा जास्त खाऊ घालण्यात काही फायदा नाही, हे लक्षात ठेवा.

  • एकाच वेळी जास्त अन्न देण्याऐवजी दोन किंवा तीन वेळा खायला द्या.

  • मुलांचा जेवणाचा अनुभव कंटाळवाणा किंवा थकवणारा होऊ देऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.