Parenting Tips : ट्रॅव्हल, फूड नव्हे तर, पॅरेंटिंगच्या 'या' टिप्स ठरल्या 2022 मध्ये हीट

आपल्या मुलाने प्रत्येका क्षेत्रात प्रगती करावी असं प्रत्येकाला वाटत असत
Parenting Tips
Parenting Tipsesakal

Parenting Tips : आपल्या मुलाने प्रत्येका क्षेत्रात प्रगती करावी असं प्रत्येकाला वाटत असत, अभ्यासासोबत त्याने खेळ आणि कलेतही एक्स्पर्ट व्हावं यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीत पालकांची भूमिका महत्वाची असते. आपण त्यांना घरात नक्की कसे वातावरण देतो आहोत यावरती त्यांची जडणघडण अवलंबून आहे.

Parenting Tips
Cancer Vaccine : खुशखबर! कॅन्सरचा धोका टळला; डॉक्टरांनी शोधल वॅक्सिन

वर्ष संपतंय तसं सगळ्याच गोष्टींचे रीपोर्ट जाहीर होता आहे; यावर्षी मुलांचे स्मार्ट गॅजेटचे आकर्षण वाढले होते; त्यांना लॅपटॉप, मोबाइल, व्हिडियो गेम जास्त आवडता आहेत असा सऱ्व्हे साधारण लक्षात आला आणि याला पालकांचाही बराच पाठिंबा होता; याआधी अस घडलं नव्हत पण कोरोनाच्या काळात बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे त्याला पर्याय नव्हता. स्मार्ट गॅजेट्स बद्दलच्या पालकांच्या बदलामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले आहेत. अशात 2022 चा आराखडा लक्षात घेऊन 2023 मध्ये तुम्ही या गोष्टी बदलू शकतात; आपल्या मुलांशी अजून जवळचे नाते तयार करण्यासाठी हे गरजेच आहे.

Parenting Tips
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

1. फिल्टर न ठेवता गप्पा

आई वडील म्हटलं की काहीही बोलतांना दोघी बाजूने एक फिल्टर राखल जायचं; पण या वर्षात मुलंही आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलतांना दिसले; कुटुंबामध्ये लहान मोठयाहूनही जास्त मैत्रीच वातावरण होतं. हा बदल असाच पुढे राहिला तर मुल घरच्यांपासून काहीही लपवणार नाही.

Parenting Tips
Couple Goals : हेल्दी रिलेशनशिपसाठी 2023 मध्ये करा या गोष्टींच पालन

2. आई तितकाच बाबाही हवा

मुलांच्या संगोपनाचा प्रश्न आला की फक्त आईच नाव घेतलं जातं; पण यावर्षी तो कल बदलला आहे, बाबाही घरातच सापडल्यामुळे दोघांनी मुलाच्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन, बाबांनीही मुलांसोबत वेळ घालवता आला. मुलांच्या खेळण्यापासून, शिक्षणापासून तर इतर अनेक कामांपर्यंत मुलांना आता बाबा पण तितकाच लागू लागला आहे. यामुळे मुलांमध्ये आणि बाबांमध्ये नकळत तयार होणारी दरी आपोआप कमी होईल.

Parenting Tips
Sanjay Gandhi Death Anniversary : लेकाची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून इंदिरा गांधी खुश झाल्या

3. मुलांच्या छोट्या गोष्टीही सेलिब्रेट करा

लहान मुलांच मन हळव असतं, आपल्यासाठी तितकी महत्वाची न वाटणारी गोष्टही त्यांच्यासाठी खूप मोठी नसू शकते; त्यांचे छोटे छोटे आनंद सेलिब्रेट करा, त्यांना त्यातून चिअर करा. त्यांच्या बरोबर त्यांच्या अॅक्टिविटी मध्ये सहभागी व्हा.

Parenting Tips
Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

4. भेद न करता संगोपन

घरात मुलासाठी एक नी मुलीसाठी एक हे वातावरण आता घातक आहे; जुन्या काळात एकवेळेस हे चाललं असतही पण आता नाही. यामुळे तुमच्या बद्दल त्यांच्या मनात अढी निर्माण होऊ शकते, दोघांनाही समसमान संधी द्या.

Parenting Tips
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

5. मुलांचा त्रास समजून घ्या

अनेकदा मानसिक त्रास हा फक्त आर्थिक असू शकतो असं काहींच ठाम मत असतं, पण मुलांना त्यांच्या वयानुसार अनेक त्रासांना समोर जाव लागू शकतं, त्याला समजून घ्या. आपल्या मुलाच्या मनात कोणत्याही विषयाबद्दल न्यूनगंड नाही ना हे समजून घ्या. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com