
Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ
Cucumber Thalipeeth Recipe : काकडीची कोशिंबीर किंवा सॅलड तुम्ही खाल्लं असेल पण काकडीचे थालीपीठ कधी ट्राय केल आहे का? ही नक्कीच एक वेगळी रेसिपी आहे. तुमच्या घरी जर लहान मूल असतील तर त्यांच्यासाठी हा नवीन प्रयोग ठरू शकतो.काकडी खाणं हे खूप हेल्दी असत. पण दररोज काकडी खाणं शक्य होईलच असं नाही; त्यापेक्षा तुम्ही काकडीचे थालीपीठ करून खाऊ शकतात. बघूया त्यासाठीची रेसिपी.
साहित्य :
1 काकडी
1 मोठी वाटी कणिक
1 छोटी वाटी तांदळाचे पीठ
1 टेबलस्पून आलं लसुनाची पेस्ट
4 ते 5 हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
1 टेबलस्पून तिखट
1/2 टेबलस्पून हळद
5 कढीपत्ता
1 टेबलस्पून ओवा
1 टेबलस्पून तीळ
कृती:
सर्वात आधी काकडी स्वच्छ धुन घ्या आणि किसून घ्या.
मिरची व कढीपत्ता मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
आता, तांदळाचे पीठ, कणिक, किसलेली काकडी, आल लसुनाची पेस्ट, बारीक केलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता, त्चवीनुसार मीठ, हळद आणि आवडीनुसार ओवा, तीळ असं सगळं टाकून थालीपीठाला लागेल असं छान पीठ मळून घ्या.
गरम तव्यावर थोड तेल टाकून थालीपीठ करून घ्या. दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.
गरमागरम मस्त खमंग काकडीचे थालीपीठ लोणाच्या सोबत सर्व्ह करा.