Parenting Tips : मुलांना सतत नियंत्रणात ठेवलं म्हणजे पालकत्व जमलं असं नाही, आधी त्याचे परिणाम समजून घ्या

मुलांना शिस्तबद्ध काटोकोर सवयी लावताना एक गोष्ट लक्षात घ्यावी
Parenting Tips
Parenting Tipsesakal

Parenting Tips :

आरोही नावाची ६ वर्षाची एक गोंडस मुलगी बिल्डींगमधील सर्वांचीच लाडकी होती. खेळकर अन् अभ्यासात हुशार असलेली आरोही चार चौघात मिसळायला घाबरायची. सतत तिला कसलं तरी दडपण आहे असंच वाटायचं.

ही गोष्ट तिच्या शेजारी असलेल्या ताईंच्या लक्षात आली. अन् त्यांनी आरोहीला विचारलं, तू खेळत का नाही, तू आमच्या बाळासोबत खेळायला का येत नाही. त्यावर ती आई ओरडेल, असं बोलून पळून गेली.

मम्मी ओरडेल, मारेल म्हणून मुलं काही गोष्टी करायच्या टाळतात. ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी, सतत मुलांना दडपनात ठेवणं त्यांच्या मनावर परिणाम करणारं ठरू शकतं.      

Parenting Tips
Parenting Tips : बाळाचा रंग दर तीन महिन्यांनी बदलतो, हे खंरय का?

काही पालक आपल्या मुलांच्या बाबतीत अति नियंत्रण ठेवतात. प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींबद्दल त्यांना समज देतात. त्यांना अनेक गोष्टींपासून रोखतात. पण असे वारंवार केल्याने त्याचा परिणाम मुलांच्या प्रकृतीवर दिसून येतो.

याचा केवळ मुलांच्या मनावर नाहीतर पालक आणि मुलाच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. मुलांमध्ये त्यांच्या पालकांबद्दल नकारात्मकता निर्माण होते. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, या सर्व गोष्टींचा अनेकदा मुलाच्या आत्मसन्मानावर आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

Parenting Tips
Parenting Tips : लहान मुलांच्या सतत रडण्यामागे असू शकतात 'ही' कारणे; घ्या जाणून

आजकाल, अशीच एक पालकत्वाची पद्धत चर्चेत आहे, जी हायपर पॅरेंटिंग म्हणून ओळखली जाते. ही नेमकी काय आहे आणि त्याचा मुलांवर, नात्यावर कसा परिणाम होतो हे पाहुयात.

हायपर पालकत्व म्हणजे काय?

खरं तर, ही एक प्रकारची पालकत्वाची पद्धत आहे - ज्यामध्ये पालक आपल्या मुलांची प्रत्येक चूक आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारच्या पालकत्वाचा प्रभाव असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांनी प्रत्येक प्रयत्नात सर्वोत्तम असावे असे वाटते. पण पालकत्वाच्या या प्रकारात पालक आपल्या मुलांची कोणतीही चूक मान्य करत नाहीत.

मुलांवर परिणाम होतो

या गोष्टीचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होत आहे. स्वतःहून निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत नाही. अनेक वेळा पालक आपल्या मुलांच्या चुका मान्य करत नाहीत, त्यामुळे मुलांनाही समजू शकत नाही.

Parenting Tips
Parenting Tips : बाळाचा रंग दर तीन महिन्यांनी बदलतो, हे खंरय का?

ताणतणाव

तुम्हीही तुमच्या मुलांवर प्रत्येक गोष्टीसाठी दबाव टाकलात तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो.अशा प्रकारच्या पालकत्वात वाढणारी मुले तणावपूर्ण जीवन जगतात. मुलं दाखवत नसली तरी ती आतल्या आत तुटतात. त्याचा मुलांच्या वाढीवर परिणाम होतो.

पालकांना शत्रू समजणे

पालकत्वाच्या या शैलीमुळे मुले नेहमीच त्यांच्या पालकांना शत्रू मानतात. तेच चालू राहते आणि कालांतराने ते आपल्या पालकांचा तिरस्कारही करू लागतात. याशिवाय हायपर पॅरेंटिंगमुळे मूल नेहमी घाबरत राहते.

Parenting Tips
Parenting Tips : मुले इतरांशी उद्धटपणे वागतात? मग, ‘या’ टिप्सच्या मदतीने करा सुधारणा

मुलांचे हसू गायब होणं

मुलांना शिस्तबद्ध काटोकोर सवयी लावताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे मुलांचं बालपण हरावून घेऊ नये. मुलांशी बोलण्याची पद्धत वेगळी असते. त्यांना ओरडून तुम्ही तुमची गोष्ट ऐकायला लावू शकता. पण ती गोष्ट मुलं मनापासून करणार नाहीत. त्यामुळे मुलांना एखाद्या गोष्ट करायला सांगाताना या गोष्टींचा नक्की विचार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com