बाळाचा सांभाळ एकटया व्यक्तीला करावा लागतोय ? तर फॉलो करा या टिप्स

टीम ई सकाळ
Monday, 1 March 2021

लहान मुलांची काळजी घेणं सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पालकांची असते. त्यामध्ये त्यांची मालिश करणे, योग्य स्किन केअर प्रॉडक्ट शोधने, योग्य कपडे घालणे अशा गोष्टी असतात.

 लहान मुलं कुटूंबात एक प्रकारचा आनंद आणण्यात खूप महत्त्वाची भुमिका बजावत असतात. त्यांचं हसणं, खेळणं, बोलणं अशा अनेक गोष्टी आपल्याला एक प्रकारचा आनंद आणि मनोरंजन करत असतात. पण त्यांची काळजी घेणं सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पालकांची असते. त्यामध्ये त्यांची मालिश करणे, योग्य स्किन केअर प्रॉडक्ट शोधने, योग्य कपडे घालणे अशा गोष्टी असतात.

कोरोना काळात बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना पुरेसा वेळ दिला आहे. पण जसंजसं मार्केट उघडलं तसं कामं सुरु झाली. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्यात कधीकधी वेळ कमी पडतो. एकत्र कुटूंब असेल तर त्याचा खूप फायदा पालकांना होत असतो. कारण लहान मुलांची काळजी घेण्यासाठी घरातील इतर लोकही असतात.

लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि कोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहूया-

1. मसाज कसा करावा?

लहान मुलं खूप चपळ आणि चंचल असतात. त्यांना संभाळण तसं मोठं जिकीरीचं काम असतं. ते नेहमी हलत-डूलत असतात. मसाज करणे म्हणजे एक प्रकारची परिक्षाच असते. लहान मुलांच्या मसाजवेळी पहिल्यांदा कोणतंही सौम्य बेबी मसाज तेल घेतलं पाहिजे. तेल असं घ्या जे हलकं आणि त्वेचेला योग्य असावं. मसाजनंतर ते त्वेचेवर राहता कामा नये. हलक्या हाताने तेल बाळाच्या अंगावरुन सौम्यपणे लावावे. शरीराच्या कोणत्याही भागावर जास्त वेळ रगडू नये. मसाजने बाळाची त्वचा मुलायम आणि आरोग्यदायी बनत असते. मसाजमुळे पालक आणि बाळामधील नातंही घट्ट होत असते.

2.बाळाला अंघोळ घालताना कोणती काळजी घेतली पाहिजे-

पहिल्यांदा तर तुम्ही एखादा सौम्य बेबी सोप घ्या कारण बाळाची त्वचा नाजूक असते. लहान बाळांच्या त्वचेसाठी वेगळी साबणे असतात. बाळाला अंघोळ घालताना एका हाताने आधार दिला पाहिजे. तसेच बाजारात वेगवेगळी बेबी वॉश असतात, त्याचाही उपयोग बाळाला अंघोळ घालताना केला तर उत्तमच. वन हॅंड इजी टू पम्प पॅक्स बाळांना अंघोळ घालताना खूप उपयोगाचे ठरतात. ते वापरण्यासही सोपे असते. यामुळे एक हात तुमचा फ्री राहतो, ज्याचा उपयोग तुम्ही बाळाला आधार देण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे बाळाची अंघोळही व्यवस्थित होण्यास मदत होते.

3. केसांची काळजी कशी घ्याल-

जसं आपण आपल्या केसांची काळजी घेतो तशी बाळांच्याही केसांची काळजी घेतली पाहिजे. त्याची योग्य पध्दत माहित असणे गरजेचे आहे. काही महिन्यानंतर बाळाच्या अंघोळीदरम्यान बेबी शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करू शकता. त्यामुळे अशी बेबी शॅम्पू शोधा जी व्यवस्थित धुतली जाईल. शॅम्पू लावताना बाळाच्या डोळ्यात न जाऊ देता ती केसांना लावली पाहिजे. जर बाळाचे केस कर्ली असतील तर कंडीशनरही उपयोगाचा ठरतो.

4. त्वचेची काळजी कशी घ्याल-

बाळाची त्वचा खूपच नाजूक असते. जास्त पाण्याचा वापरही बाळांच्या त्वचेसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे अंघोळीनंतर बाळाच्या त्वचेला काही प्रमाणात मॉइस्चराइजेशन केलं पाहिजे.

संपादन - प्रमोद सरावळे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents tips to make parenting easy for nuclear family couples

Tags
टॉपिकस
Topic Tags: