

Cosmetic Procedures Growth in India
sakal
Over 1.28 Million Cosmetic Procedures in a Year Highlight Beauty Obsession: पूर्वी केवळ गरज किंवा अपवाद म्हणून पाहिले जाणारे सौंदर्यवर्धक उपचार आता आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि जीवनशैलीचा भाग बनू लागले आहेत. चेहऱ्याच्या सौंदर्यापासून ते त्वचा, केस आणि शरीररचनेपर्यंत नागरिकांचा वाढता कल या उपचारांकडे स्पष्टपणे दिसून येत आहे.
'आंतरराष्ट्रीय सौंदर्य आणि प्लास्टिक सर्जरी संस्थे'च्या (आयएसपीएपीएस) आकडेवारीनुसार, भारतात गेल्यावर्षी एकूण १२ लाख ८८ हजार ८४० सौंदर्यवर्धक प्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी काही प्रक्रिया शस्त्रक्रियेच्या साह्याने, तर काही शस्त्रक्रियाविरहित होत्या. यावरून भारतात सौंदर्यवर्धक उपचारांचा कल झपाट्याने वाढताना दिसन येत आहे.