

Permissive Parenting Guide: Balancing Love and Boundaries for Your Child’s Future
esakal
Friendly Parenting vs Permissive Parenting: प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर कायम आनंद पाहायचा असतो. मुले आपल्याला घाबरू नयेत, त्यांनी आपल्याला सर्व काही मित्रांसारखे सांगावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. पण, मुलांचे मित्र बनण्याच्या आणि त्यांचे अतोनात लाड करण्याच्या नादात आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्या भविष्यात मुलांसाठीच अत्यंत नुकसानकारक ठरू शकतात. याच मुद्द्यावरून बालकांच्या संगोपनात 'परमिसिव पेरेंटिंग' (Permissive Parenting) ही संकल्पना चर्चेत येते.हे पेरेंटिंग स्टाइल नेमके काय आहे आणि याचा मुलांच्या स्वभावावर कसा परिणाम होतो, ते सविस्तर जाणून घेऊया.