Personality Development Tips
Personality Development Tipsesakal

Personality Development Tips : अशी करा दिवसाची सुरूवात, हेल्थसोबत पर्सनॅलिटी होणार डेव्हलप

दिवसाची सुरुवात आळसावलेली किंवा फोन बघत करण्यापेक्षा या प्रकारे केली तर त्याचे दुहेरी फायदे मिळतात. जाणून घ्या.

How To Start A Day To Be Energetic and Happy : बहुतेकदा सकाळी अलार्म वाजला की आपण तो बंद करून ५ मीनिट म्हणत परत तोंडावरून पांघरूण घेतो. किंवा सकाळी उठल्या उठल्या फोन हातात घेऊन बिझान्यावरच बराच वेळ घालवतो. शिवाय चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना रोज ठरवतो उद्यापासून करू. पण मग तो उद्या उगवतच नाही. यामुळे हेल्दी रुटीन लागत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या हेल्थ बरोबरच पर्सनॅलिटीवर, कामावर सगळ्यावरच होतो. त्यासाठी काही सोप्या गोष्टी आजपासूनच सुरू करा.

रात्री झोपण्यापुर्वी दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करा

दिवसाची प्रेरणादायी सुरुवात करण्यासाठी हे फार आवश्यक आहे. जर दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असं वाटत असेल आणि हेक्टीक शेड्युल कमी करायचं असेल तर आदल्याच दिवशी दुसऱ्या दिवसाच्या ठरलेल्या कामांचं प्लॅनिंग करा. यात अगदी सकाळी घालायच्या कपड्यांसह, नाश्ता काय करायचा, दिवसभराच्या कामांची लिस्ट करून ठेवा. रात्री रिलॅक्स डोक्याने हे ठरवणं फार सोप आणि पटकन होतं. पण तेच सकाळी गडबडीचं ठरतं.

Personality Development Tips
Personality Developement: निगेटिव्हिटी पासून दूर राहून 'असं' ओळखा तुमच्यातील Hidden Talent

सकाळच्या शांततेचा आनंद घ्या

सकाळी उठल्या उठल्या घड्याळाच्या काट्यावर स्वार होऊन कामाला लागण्या आधी थोड्यावेळ शांततेचा आनंद घ्या. मनाला आणि मेंदूला हेल्दी ठेवण्यासाठी हा फार उपयुक्त प्रकार आहे. यात शांत आणि नव्याने फुलणाऱ्या दिवसा, निसर्गाचा आनंद घ्या. याकाळात आदल्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवा आणि नवा उत्साह अनुभवा.

Personality Development Tips
Human Development Index: भारताची यंदाही स्थानांमध्ये घसरण, नॉर्वे टॉपर!

वर्क आऊट आवश्यक

आपण बऱ्याचदा सकाळी व्यायाम करण्याचा कंटाळा करतो. पण जर रोज व्यायामासाठी १० मिनीटंही काढलेत तरी तुम्हाला दिवसभरात याची एनर्जी जाणवेल. यामुळे एंडोर्फीन नावाचं हार्मोन पंप होतं. त्यामुळे तुम्हीच तुमच्या आत सकारात्मक बदल अनभवू शकतात.

कठीण कामांवर फोकस करा

सकाळची शांतता आणि व्यायाम झाल्यावर दिवसभरातलं जे काम कठीण वाटतं त्यावर फोकस करा. ते काम कठीण म्हणू जर तुम्ही पुढे पुढे ढकलत असाल तर आता ते करण्यासाठी योग्य प्लॅनिंग करण्याचा विचार करा. त्यामुळे ते काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल.

योग्य आहार निवडा

सकाळी उठून वर्क आऊट करायचं आणि कामाला लागायचं एवढंच नाही तर योग्य आहार घेणं पण फार आवश्यक आहे. रात्रभर बॉडीत क्लिनिंग प्रोसेस सुरू असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर शारीरात आम्ल वाढलेलं असतं. सकाळी भूक लागते. अशावेळी नाश्ता योग्य आणि पोटभर करणं गरजेचं असतं. ज्यामुळे संपूर्ण दिवस एनर्जिएटिक राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com