Human Development Index: भारताची यंदाही स्थानांमध्ये घसरण, नॉर्वे टॉपर!

World_Map
World_Map

नवी दिल्ली : मानव विकास निर्देशांकामध्ये यंदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो १८९ देशांच्या यादीमध्ये १३१ व्या स्थानी आला आहे. संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाच्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. देशातील आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो. मागील वर्षी भारतीयांचे जीवनमान हे ६९.७ वर्षे एवढे होते. बांगलादेशात ते ७२.५ वर्षे, पाकिस्तानात ६७.३ वर्षे एवढे असल्याचे हा अहवाल सांगतो.

मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत, भुतान (१२९), बांगलादेश (१३३) आणि पाकिस्तान (१५४) व्या स्थानी आहे. भारताचे मागील वर्षीचे मानव विकास निर्देशांकातील मूल्य ०.६४५ एवढे आहे. यामुळेच भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.

या देशांची आघाडी
या निर्देशांकामध्ये नॉर्वे पहिल्यास्थानी असून त्यानंतर आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो. या निर्देशांकामध्ये भारताच्या स्थानामध्ये घसरण झाली म्हणजे भारताची कामगिरी घसरली असा याचा अर्थ होत नाही तर अन्य देशांच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाली असे हा अहवाल सांगतो असे यूएनडीपीचे निवासी प्रतिनिधी शोको नोडा यांनी सांगितले. भारत अन्य देशांच्या विकासाला हातभार लावू शकतो. कार्बन उत्सर्जनाबाबत या देशाची कटिबद्धता वाखाणण्याजोगी असल्याचे हा अहवाल सांगतो.

महिलांच्या छळाचे प्रमाण घटले
देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते २०१८ मधील ६ हजार ८२९ डॉलरवरून ६ हजार ६८१ डॉलरवर आले आहे. यामध्ये लोकांच्या क्रयशक्तीचा विचार करण्यात आला होता. कोलंबियापासून ते भारतापर्यंतच्या देशांचा अभ्यास केला असता एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येते. यामुळे लिंगभेदावर आधारित छळ देखील कमी झाला आहे.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com