- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागारव्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही संभाषणाची सुरुवात कशी करता त्यापासून उभे कसे राहता, कसे हसता इथपर्यंत अनेक गोष्टींचं मिश्रण असतं. ‘ग्रूमिंग’शी संबंधित अशाच मुद्द्यांबाबत हे मार्गदर्शन..काही दिवसांपूर्वी एका कंपनीने ‘व्यावसायिक प्रतिमा’ या विषयावर बोलण्यासाठी मला एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. कार्यक्रम झाल्यावर अनेक लोक भेटायला, बोलायला आली, त्यात एक बाई मला भेटल्या. सेशनमधल्या विषयाबद्दल त्यांनी मतं मांडली, काही प्रश्न विचारले आणि माझ्या मतांची स्तुती केली. दोन-तीन मिनिटं बोलल्यावर, बाकी अनेक जण बोलायला थांबलेले असल्यामुळे मी बोलणं आटोपत घेतलं..मात्र, बोलणं संपायच्या आधी त्यांना त्यांचं नाव विचारणार तेवढ्यात, त्या गर्दीत हरवून गेल्या आणि आमचा परिचय झाला नाही. काही दिवसांनी त्यांनी मला फोन केला, ओळख पटवून दिली, मी घेतलेल्या सेशनचा त्यांना कसा फायदा झाला हे सांगितलं. या वेळेला मात्र मी त्यांना त्यांचं नाव आणि माहिती विचारली आणि आवर्जून फोन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.मैत्रिणींनो, आपल्या रोजच्या आयुष्यात किती लोक आपल्याला रोज भेटतात. अगदी भाजीवाल्यापासून ते किराणा दुकानदारांपर्यंत, सोसायटीमधल्या लोकांपासून, कामाच्या ठिकाणच्या लोकांपर्यंत. मात्र, आपल्याला त्यांचं साधं नावही माहिती नसतं. खरं तर स्वपरिचय म्हणजेच स्वतःची ओळख, हा संवादाचा पाया आहे..नवीन नातेसंबंधांची सुरुवात आहे आणि एक संधी आहे तुमची सकारात्मक पहिली छाप पाडण्याची, अगदी कामाच्या आणि व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा. घरी कामाला येणाऱ्या बाईशी, भाजीवाल्याशी अगदी किराणा दुकानदारांशी संवाद साधल्याने, तुमचा स्वपरिचय सांगितल्यानं, त्याच्याबद्दल माहिती जाणून घेतल्यानं, नवीन नाती जुळतील. तुमचं चांगलं सामाजिक कौशल्य दिसून येईल. तसंच तुमची ओळख एक सभ्य, आदरयुक्त आणि संस्कारशील व्यक्ती म्हणून होईल..त्यामुळे मैत्रिणींनो, यापुढे तुम्ही कधी कोणाला अगदी थोड्या वेळासाठी जरी भेटलात, तरी स्वतःची ओळख करून द्या. स्वतःचं नाव सांगा. स्वतःबद्दल थोडक्यात माहिती द्या आणि समोरच्याला त्याचे नाव विचारा, त्याची थोडक्यात माहिती जाणून घ्या.आपणही आज पहिल्यांदाच भेटत असल्यामुळे, सगळ्यात आधी मी माझा परिचय तुम्हाला देते. माझं नाव अश्विनी आपटे-खुर्जेकर. व्यवसायानं मी एक अभिनेत्री आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्याचबरोबर मी ‘इमेज कन्सल्टंट’ आहे आणि सध्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ‘प्रोफेशनल कम्युनिकेशन’ शिकवते. आजपासून पुढचे काही आठवडे अथवा महिने मी तुमच्याबरोबर या आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधणार आहे. तर असेच भेटत राहूया. धन्यवाद..स्वतःची ओळख कशी करून द्यावी?स्मितहास्याने सुरुवात करास्वतःचे नाव स्पष्टपणे सांगायोग्य अभिवादन करास्वतःबद्दल थोडक्यात माहिती सांगासमोरच्या व्यक्तीमध्ये स्वारस्य दाखवासंवाद सकारात्मक, संक्षिप्त आणि आदरयुक्त ठेवा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.