
ऐश्वर्या शेट्ये / विदिशा म्हसकर / शाश्वती पिंपळीकर / प्राजक्ता परब / आकांक्षा गाडे
मैत्री ही नात्यांमध्ये एक अद्भुत गोष्ट आहे. ती कधी, कुठे, कशी निर्माण होते, हे कोणीच सांगू शकत नाही. ती नात्यांच्या पलीकडची भावना आहे. अनेक वेळा नशीब आपल्याला काही खास व्यक्तींच्या जवळ घेऊन येतं, ज्यांच्यासोबत आपण एक आयुष्यभर लक्षात राहील असा सुंदर प्रवास करू शकतो. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेनं केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं नाही, तर या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या पाच अभिनेत्रींच्या आयुष्यात एक अतूट मैत्रीची कहाणी रचली.