

Doctors Reveal the Common Mistake That Makes Us Sleepy After Lunch
sakal
What is Food Sequencing: दुपारचं जेवण झालं की काही वेळातच डोळे जड व्हायला लागतात. काम करताना जांभया यायला लागतात. आणि संध्याकाळी बरोबर ४ वाजता चहा प्यायची तीव्र इच्छा होते. तुमच्यासोबतही असं होतं का?
अनेकांना वाटतं की हे आळसामुळे किंवा कमी झोपेमुळे होतं. पण खरं कारण काही वेगळंच असू शकतं. याचा संबंध तुमच्या जेवणाशी आणि ते खाण्याच्या पद्धतीशी असू शकतो. जेवणातील एक छोटी सवय बदलली, तर जेवणानंतर येणारी झोप आणि थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते.