Female Facial Hair: काही महिलांना कशामुळे येतात दाढी अन् मिशा? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

काही मुलींच्या चेहऱ्यावर इतर मुलींपेक्षा जास्त केस दिसतात.यामुळे अशा मुली चर्चेचा विषय ठरतात. पण असे का होते हे जाणून घेऊया.
Female Facial Hair
Female Facial HairSakal

prachi nigam up topper board exam causes of female facial hair

महिलांच्या चेहऱ्यावर केस येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण कधी कधी काही महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस येतात. अशा महिला समाजात चर्चेचा विषय बनतात. काही महिला चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी लेझर ट्रीटमेंट वापरतात. अलिकडेच यूपी बोर्ड इयत्ता 10 मधील टॉपर प्राची निगमला तिच्या चेहऱ्याच्या केसांवरून सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले आहे. जाणून घेऊया काही महिलांच्या चेहऱ्यावर केस जास्त का येतात.

मुलांनाच दाढी का येते?

तज्ज्ञांच्या मते 11 ते 13 वर्षे वयाच्या मुला-मुलींच्या शरीरात बरेच बदल होतात. या वयात लैंगिक ग्रंथी विकसित होतात. या वयात दोन्हीमध्ये अनेक ग्रंथी आणि हार्मोन्स तयार होतात. यामुळे शरीरात तणाव निर्माण होतो. त्यांना एंड्रोजेन्स म्हणतात.

मुलांमध्ये, दाढी आणि मिशा एंड्रोजेनमुळे वाढतात तर मुलींमध्ये तयार होणाऱ्या हार्मोन्सला इस्ट्रोजेन म्हणतात. मुलांमध्ये एन्ड्रोजनमुळे त्यांचा आवाजही जड होतो. एंड्रोजेन आणि एस्ट्रोजेन दोघांच्या शरीरात अनेक फरक निर्माण करतात. एकीकडे, इस्ट्रोजेन्स मुलींना मऊपणा देतात, तर दुसरीकडे, एन्ड्रोजेन मुलांना कठोर बनवतात.

Female Facial Hair
चेहऱ्यावरचे नकोसे केस काढण्यासाठी ही सोपी ट्रिक वापरा, चेहरा दिसेल उजळ

मुलींना दाढी का येते?

तज्ज्ञांच्या मते मुलींना दाढी येण्यामागे हार्मोन्समधील विकार असू शकते. ज्याला पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतात. हार्मोन्समधील हा बदल महिलांच्या प्रजनन व्यवस्थेला त्रास देतो. त्यामुळे महिलांना दाढी किंवा मिशा येतात. तसेच हार्मोन्समधील या बदलांमागे अनेक अनुवांशिक कारणे असू शकतात.

जेव्हा शरीरातील हार्मोनल विकारांमुळे महिलांच्या अंडाशय कमकुवत होतात आणि अंडकोषातून अंडी बाहेर पडत नाहीत, तेव्हा एक प्रकारची गाठ तयार होते. गाठमध्ये मुळात एक द्रव असतो, जो एंड्रोजन हार्मोन तयार करतो. यामुळे पीसीओएस विकसित होण्यास सुरुवात होते आणि महिलांच्या चेहऱ्यावर केसांची वाढ देखील होते.

  • जाणून घ्या इतर कारणे

महिलांच्या चेहऱ्यावर केस वाढण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत हर्सुटिझम म्हणतात. यामागे तीन प्रमुख कारणे आहेत.

  • अनुवांशिकता

कौटुंबिक अनुवांशिकता यामागचे कारण असू शकते.

  • हार्मोनल बदल

जेव्हा हार्मोन्स असंतुलित असतात, तेव्हा महिलांच्या शरीरात पुरुष सेक्स हार्मोन्स जास्त प्रमाणात वाढतात. हार्मोनल असंतुलन होण्यामागे चुकीचे जीवनशैली, व्यायाम न करणे, पीसाओडी अनेक कारणे आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com