झूम : स्वस्त ‘कायगर’ची दणकट सवारी

लोकप्रिय ठरलेल्या डस्टर, क्विड, ट्रिबरनंतर रेनोने ‘कायगर’ ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील कार २०२१ च्या सुरुवातीला भारतात दाखल केली.
Kiger Car
Kiger CarSakal

मूळच्या फ्रान्सच्या असलेल्या ‘रेनो’ कंपनीने भारतात गेल्या दशकभरात चांगलाच जम बसवला आहे. लोकप्रिय ठरलेल्या डस्टर, क्विड, ट्रिबरनंतर रेनोने ‘कायगर’ ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील कार २०२१ च्या सुरुवातीला भारतात दाखल केली. कायगरचे टर्बो मॅन्युअल ट्रान्स्मिशन (आरएक्सझेड) व्हेरिएंट चालवण्याचा नुकताच अनुभव घेतला. आधुनिक आणि रांगडी डिझाईन व मायलेजमुळे ही कार सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ठरू शकते.

भारतीय रस्त्यांवर सध्या एसयूव्ही (स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकल) प्रकारातील कारमध्ये मोठी स्पर्धा आहे. टाटा नेक्सॉन, मारुती-सुझुकी ब्रिझा, महिंद्रा एक्सयूव्ही ३००, टोयोटा अर्बन क्रुझर, निस्सान मॅग्नाईट आदी अनेक कार बाजारात असताना रेनो इंडियाने ‘कायगर’ ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील कार जानेवारी अखेरीस बाजारात दाखल केली. या कारची एक्स शोरूम किंमत ५ लाख ४५ ते ९.५५ लाख या दरम्यान आहे. पाच ते १० लाखांमध्ये एखादी बजेट एसयूव्ही कार घ्यायची असल्यास कायगर हा एक पर्याय होऊ शकतो.

कायगरचा लुक हा ‘क्विड’प्रमाणेच वाटत असला, तरी प्रत्यक्षात कारचा आकार (लांबी ३९९१ मिमी, रुंदी १७५० मिमी, उंची १६०५ मिमी) आणि ग्राउंड क्लिअरन्स (२०५ मिमी) पाहिल्यास हे मत बदलते. कायगरमध्ये ३ सिलिंडर १.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, ५-स्पीड मॅन्युअल/सीव्हीटी ट्रान्स्मिशन; ३ सिलिंडर १.० लिटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल, ५-स्पीड मॅन्युअल/एएमटी ट्रान्स्मिशन आदी दोन प्रकारचे इंजिन दिले आहे. या कारची एक विशेष बाब म्हणजे बेस व्हेरिएंटपासूनच एलईडी डीआरएल (डेटाईम रनिंग लॅम्प), आरशांवर टर्न इंडिकेटर आणि एलईडी टेल लॅम्प तसेच एकत्रित दोन रंगांचा पर्यायही मिळतो.

सुलभ हाताळणी

कायगर महामार्ग, घाट, खड्डेयुक्त रस्ते, शहरी रस्त्यांवर चालवण्याचा अनुभव घेतला. ड्रायव्हर सीटवर बसल्यानंतर बोनेटच्या दोन्ही कडा स्पष्ट दिसत असल्याने टिपिकल एसयूव्ही चालवण्याचा फिल येतो. ३ सिलिंडर इंजिन दिल्याने कायगर चालवताना थोडे व्हायब्रेशन जाणवतात. क्लच पॅड स्मूथ दिल्याने ट्राफिकमध्ये किंवा खडबडीत रस्त्यांवर ही कार आरामात चालवू शकतो. कायगरमध्ये नॉर्मल, ईको आणि स्पोर्ट्स आदी तीन ड्रायव्हिंग मोड्स मिळतात. नॉर्मल मोडवर कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर अगदी आरामात ही गाडी चालवू शकतो. ईको मोडमध्ये जास्त एक्सिलिरेशन देण्याची गरज पडत नाही. या मोडमध्ये कारची हाताळणी अधिक सुलभ होते. स्पोर्ट मोडमध्ये कमी एक्सिलिरेशनमध्येही कार पळते आणि स्टेअरिंग थोडी जड होते.

कार चालवताना समोरील, डाव्या आणि उजव्या बाजूची दृष्यमानता चांगली जाणवते. परंतु, पाठीमागील काच आकाराने छोटी असल्याने कार पाठीमागे घेताना पार्किंग कॅमेरा गरजेचा पडतो. कायगरमध्ये ४०५ लिटरचा बूटस्पेसही दिला असल्याने भरपूर सामान राहू शकते. तत्काळ थंड होणारी वातानुकूलन यंत्रणा, कारची सुलभ हाताळणी आणि दमदार ब्रेकिंग यंत्रणेने लांबच्या प्रवासातही थकवा जाणवत नाही. ही कार सरासरी १७ ते १८ किलोमीटर प्रतिलिटर मायलेज मिळते.

फीचर्स आणि सुरक्षा

  • ८ इंच टच स्क्रीन, ८ स्पीकर साऊंड सिस्टिम, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल

  • चिल्ड ग्लोव्ह बॉक्स, ७ इंच फूल एलसीडी ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कार प्ले.

  • आतील भागात हार्ड प्लास्टिकचा वापर केला आहे. दोन ग्लोव्ह बॉक्स, बॉटल होल्डर, सेंट्रल आर्मरेस्ट आदी मिळून २९ लिटरचा स्टोरेज कारच्या आतील बाजूमध्ये दिला आहे.

  • सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्युअल एअर बॅग, ईबीडी-एबीएस, व्हेरिएंटनुसार साइड एअर बॅगही उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com