esakal | झूम : नवी वाहने, नवे चैतन्य...
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle

झूम : नवी वाहने, नवे चैतन्य...

sakal_logo
By
प्रणीत पवार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर वाहन उद्योगात नवचैतन्य संचारले आहे. वाहन विक्रीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नवनवीन कार, दुचाकी बाजारात दाखल होत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीची ऑगस्टमधील आकडेवारी अद्याप जाहीर झाली नसली, तरी ‘फाडा’ या संस्थेच्या नोंदीनुसार जुलै २०२१मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये अनुक्रमे २७.५६ आणि ६२.९० टक्के वाढ झाली आहे. परिणामी, वाहन कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. त्यातून काही नवीन आणि अद्ययावत वाहने बाजारात दाखल होत आहेत. यामाहा, होंडा या दुचाकी कंपन्यांबरोबरच मर्सिडिझ आणि ह्युंदाई कंपनीने नुकतीच नवीन वाहने बाजारात आणली. याचा घेतलेला हा आढावा.

यामाहा ‘एमटी १५’ मॉन्स्टर एनर्जी

यामाहा इंडिया मोटरने ‘द कॉल ऑफ द ब्लू’अंतर्गत ‘एमटी-१५’ची मॉन्स्टर एनर्जी मोटो जीपी एडिशनची घोषणा केली आहे. यामाहाने या बाईकला स्टँडर्ड एमटी-१५ पेक्षा वेगळी दिसण्यासाठी विविध बदल केले आहेत. या बाईकचे टँक श्राऊड अर्थात इंधन टाकीच्या वरील भाग (अच्छादन), इंधन टाकी आणि साइड पॅनेलवर यामाहा मोटो जीपीचे ब्रँडिंग केले आहे.

इंजिन : एसओएचसी, फ्यूएल इंजेक्टेड, लिक्विड कूल्ड, ४-स्ट्रोक, ६-स्पीड ट्रान्स्मिशन, ४-वॉल्व्ह, १५५ सीसी इंजिन

फीचर्स : साईड इंजिन कट-ऑफ स्विच, ए अँड एस क्लच, सिंगल चॅनल एबीएस, यूनी-लेव्हल सिट, मल्टी फंक्शन निगेटिव्ह एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, बाय फंक्शनल एलईडी हेडलाईट, एलईडी टेल लाइट आणि अंडर काऊल

किंमत : १ लाख ४७ हजार ९०० रुपये

आय-२० ‘एन लाईन’

ह्युंदाई मोटर इंडियाने बहुप्रतिक्षित ‘आय २० इनलाईन या हॅचबॅक श्रेणीतील कार भारतात सादर केली. ह्युंदाईची ‘एन लाईन’ श्रेणीतील ‘आय २०’ ही पहिलीच कार आहे. मोटरस्पोर्टस स्टाईलमधून प्रेरणा घेऊन या कारची रचना करण्यात आली आहे. ही कार सुरू केल्यानंतर स्पोर्टस कारसारख्या होणाऱ्या आवाजामुळे ही कार चालवताना वेगळाच फिल येणार आहे.

इंजिन : १.० टर्बो जीडीआई पेट्रोल इंजिन, आईएमटी (इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन) आणि ७ डीसीटी ट्रान्समिशन पर्याय, ११८ बीएच पॉवर, ९९८ सीसी इंजिन

फीचर्स : टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, ड्रायव्हर रिअर व्ह्यू मॉनिटर, स्वयंचलित हेडलॅम्प्स, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, वेलकम फंक्शन, सनरूफ, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेन्ट

किंमत : ११ ते १३ लाख

होंडा ‘सीबी २०० एक्स’

तरुणाईच्या बदलत्या जीवनशैलीला अनुसरून होंडा मोटरसायकल इंडियाने भारतात नवी ‘सीबी२००एक्स’ ही साहसी प्रकारातील बाईक लाँच केली आहे. ही बाईक खडबडीत रस्त्यांवर, तसेच वीकेंडला शहरापासून दूर निवांत प्रवासाला जाण्यासाठी योग्य ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

इंजिन : बीएसव्हीआय पीजीएम-एफआय, ४-स्ट्रोक एअर कूल्ड, ५-स्पीड ट्रान्स्मिशन, १८४ सीसी इंजिन

फीचर्स : इंजिन स्टॉप स्वीच, आपत्कालीन थांबा आणि कमी दृश्यमानता असल्यास हझार्ड स्वीच, पीजीएम- एफआय सिस्टीममध्ये वापरलेल्या ऑनबोर्ड सेन्सर्समुळे इंधन आणि हवेचे मिश्रण होऊन पर्यायाने बाईकची कार्यक्षमता तसेच कामगिरी सुधारते.

किमत : १ लाख ४४ हजार ५०० रुपये

(एक्स-शोरूम, दिल्ली)

मर्सिडिझ ‘एएमजी जीएलई ६३ एस कूपे ’

मर्सिडिझ या लक्झरी कार कंपनीने भारतात ‘एएमजी जीएलई ६३ एस कूपे’ हे नवीन मॉडेल नुकताच लाँच केले. मर्सिडिझचे हे पहिले असे मॉडेल आहे, ज्यामध्ये कंपनीने आपल्या ईक्यू बूस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या कारमधील इलेक्ट्रिक मोटरमध्ये स्टार्टर आणि अल्टर्नेटरचा वापर केला आहे. त्यामुळे ही कार फक्त ३.८ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग पकडते.

इंजिन : ४.० लिटर ट्विन टर्बो व्ही-८ इंजिन, ९-स्पीड ऑटोमेटिक ट्रान्स्मिशन आणि ४-मॅटिक प्लस ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टिम, ६०३ बीएच पॉवर, ३९८२ सीसी इंजिन

फीचर्स : कम्फर्ट, स्पोर्ट, स्पोर्ट प्ले, इंडिव्हिज्युअल, रेस, ट्रेल आणि सँड आदी ७ विविध प्रकारचे ड्रायव्हिंग मोड्स, ॲक्टिव्ह राईड कंट्रोल, लिमिटेड स्लीप डिफ्रेंशियलसह इलेक्ट्रॉनिक रिअर एक्सल.

किंमत : २.०७ कोटी रुपये (एक्स शोरूम)

loading image
go to top