झूम : अनुभवावी ‘सफारी’

टाटा मोटर्सने भारतात १९९८मध्ये ‘सफारी’ ही एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) प्रकारातील पहिली कार बाजारात आणली.
Safari
SafariSakal

टाटा मोटर्सने भारतात १९९८मध्ये ‘सफारी’ ही एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) प्रकारातील पहिली कार बाजारात आणली. काळानुरूप या सफारीमध्ये अनेक बदल झाले आणि कारप्रेमींनी ते स्वीकारलेही. नव्या पिढीला साजेसे बदल करत २०२१मध्ये सफारी पूर्णतः नव्या रूपात बाजारात दाखल झाली आहे. लुक, आधुनिक फीचर्स, सुरक्षितता, रायडिंग क्वालिटी आदींच्या बाबतीत ही कार सरस ठरते.

‘एसयूव्ही’ प्रकारातील कारकडे सध्या ग्राहकांचा वाढता कल पाहता, कार उत्पादक कंपन्यांमध्येही चांगलीच स्पर्धा रंगली आहे. त्यापैकी अनेक कंपन्यांनी जुन्या मॉडेलमध्ये बदल करून त्यांचे ‘फेसलिफ्ट व्हर्जन’ बाजारात आणले आहेत. सफारीमध्ये पूर्णतः नवे बदल घडवून २०२१च्या सुरुवातीलाच ती बाजारात आणली. तिला समोरून अगदी ‘हॅरियर’सारखाच लुक दिला असला, तरी दोन्ही कारमध्ये थोडे बदल आहेत. ही कार चालवण्याचा अनुभव नुकताच घेतला. आपण ज्याला ‘जनरेशन गॅप’ म्हणतो, तो या सफारीमध्ये नक्कीच जाणवतो.

टाटा सफारीचे सुमारे १६ व्हेरिएंट असून, तिची एक्स शोरूम किंमत १४.९९ ते २२ लाखांदरम्यान आहे. हॅरियरमध्ये केवळ ५ आसन क्षमता; तर सफारीमध्ये ६ आणि ७ आसन, असे दोन पर्याय आहेत. तसेच १९५६ सीसी क्षमता, ४ सिलिंडर, २.० लिटर क्रायोटेक टर्बोचार्ज डिझेल इंजिन, १६७.६२ बीएच पॉवर आणि ३५० एनएम टॉर्क दिला आहे.

रायडिंगचा आनंद

ड्रायव्हिंगसाठी इको, सीटी व स्पोर्ट्‌स असे तीन मोड दिले असून, दमदार इंजिन आणि या ड्रायव्हिंग मोडमुळे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर रायडिंगचा पूर्णतः आनंद चालकासह सहप्रवाशांना लुटता येतो. ही कार महामार्गावर, शहरी आणि खडबडीत रस्त्यांवरही उत्तम रायडिंग क्वालिटी दर्शवते. १६ इंच ॲलॉय व्हील, २०५ मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स दिल्याने खड्डेमय रस्त्यांवर कोणताही त्रास जाणवत नाही. एखाद्या मोठ्या चढावर ईको मोडमध्ये गाडी असताना थोडे कष्ट पडतात; परंतु, स्पोर्ट्स मोडमध्ये शिफ्ट केल्यास चढ आरामात पार होतो. सफारीतील आसन व्यवस्थाही आरामदायी आहे. चालकासाठी इलेक्ट्रिकल अॅडजस्टेबल सिट, तर सहप्रवाशांना मॅन्युअली सिट अॅडजस्ट करावे लागतात. चालकाला बॉनेटच्या दोन्ही कडा आरामात दिसतात, त्यामुळे ही कार चालवताना टिपिकल एसयूव्ही चालवण्याचा फिल येतो. लांबच्या प्रवासात वाहनचालकाला कंटाळा किंवा थकवा येत नाही. दुसऱ्या रांगेतील आसने पहिल्या रांगेपेक्षा थोडे उंच दिल्याने त्या आसनावर बसलेल्या सहप्रवाशांनाही पुढील दृश्‍य सहज दिसते. तिसरी रांग मात्र उंच व्यक्तींसाठी लांबच्या प्रवासात अडचणीची ठरू शकते. गाडीची वातानुकूलन यंत्रणाही दमदार आहे. हॅरियरप्रमाणेच मोठा पॅनोरमिक सनरूफ हे देखील सफारीचे वैशिष्ट्य आहे. सफारीमध्ये अँड्रॉईड ऑटो आणि ॲपल कार प्लेचा पर्याय दिला असून, कारमध्ये दिलेली ‘जेबीएल’ची साऊंड सिस्टिम दमदार आहे.

सुरक्षितता आणि मायलेज

टाटा सफारीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा एअर बॅग, अँटी लॉक ब्रेक सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (इएससी), इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (इबीडी), ट्रॅक्शन कंट्रोल, ब्रेक आसिस्ट आदी फीचर्स दिले आहेत. त्याचबरोबर कॉर्नर स्टेबिलीटी कंट्रोल, पार्किंग सेन्सर, चोरीपासून संरक्षण मिळण्यासाठी सेंट्रल लॉक सिस्टिम आदी बाबीही दिल्या आहेत. सफारी डिझेल इंधनावर चालणारी असून सरासरी ११ ते १२ किलोमीटर प्रतिलिटरच्या दरम्यान मायलेज मिळतो. महामार्गावर ८० ते १०० किलोमीटर प्रतितास वेगात चालवल्यास १४च्या आसपास मायलेजही मिळू शकतो.

सफारी आणि स्पर्धेतील कार

कार मायलेज किमी/लि. किंमत

टाटा सफारी ११ ते १४ १८ ते २७ लाख

टोयोटा इन्होवा ९ ते ११ २० ते ३० लाख

ह्युंदाई अल्कझार १४ ते २० १९ ते २४ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com