झूम : कर्व्ह, अविन्याची जादुई झलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

curve car and avinya car

टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत वाहन उद्योगात ‘टॉप गिअर’ टाकून कारप्रेमींना शाश्वत पर्याय आणि स्पर्धक कंपन्यांमध्ये चांगली चुरस निर्माण केली आहे.

झूम : कर्व्ह, अविन्याची जादुई झलक

टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत वाहन उद्योगात ‘टॉप गिअर’ टाकून कारप्रेमींना शाश्वत पर्याय आणि स्पर्धक कंपन्यांमध्ये चांगली चुरस निर्माण केली आहे. त्यात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये टाटाचा आलेख दिवसेंदिवस उभारी घेताना दिसतो. नेक्सॉन, टिगॉर ईव्ही या कारना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या ‘जनरेशन-१’ कारनंतर टाटाने याचा पुढील अंक म्हणून ‘जनरेशन-२’ अंतर्गत ‘कर्व्ह’; तर ‘जनरेशन-३’अंतर्गत ‘अविन्या’ या कारच्या संकल्पना सादर केल्या. या कार नेमक्या कशा आहेत, त्यांची संकल्पना नेमकी काय, याचा हा आढावा...

टाटा कर्व्ह

  • ‘जनरेशन-२’अंतर्गत सादर केलेली ‘कर्व्ह’ ही कार ‘कुपे’ श्रेणीतील दिसते, परंतु ही आधुनिक ‘एसयूव्ही’ श्रेणीतील कार म्हणून टाटाने सादर केली आहे, जी दिसायलाही जरा हटकेच आहे.

  • एसयूव्हीचा कणखर आणि टिकाऊपणा, शिवाय कुपे श्रेणीची स्पोर्टिव्ह आणि मोहकता याच्या एकत्रित संकल्पनेतून कर्व्हची रचना करण्यात आली आहे, ज्यामुळे ही कार पारंपरिक कारपेक्षा वेगळी दिसते.

  • बाहेरून हटके दिसणाऱ्या या कारचे इंटिरिअरही तितकेच आकर्षक आहे. त्यात मोठ्या सनरूफमुळे केबिन अधिक हवेशीर करते. अंतर्गत रंगसंगतीही केबिनला साजेशी आहे. या कारमध्ये मोठा बूट स्पेसही दिला आहे.

  • ‘जनरेशन-१’मध्ये ड्रायव्हिंग रेंज २५० किलोमीटरपर्यंत देण्याचा दावा टाटाने केला आहे. आता ‘जनरेशन-२’अंतर्गत फास्ट चार्जिंग पर्यायासह ४००-५०० किलोमीटर इतकी रेंज दिली जाणार आहे.

  • आकर्षक डिझाईनसह सादर केलेली ‘कर्व्ह’ कन्सेप्ट नवीन ग्राहक किंवा तरुणाईला आकर्षित करेल, तसेच #DifferentbyDesign या संकल्पनेची प्रशंसा करेल, असा विश्वास टाटाला आहे.

टाटा ‘अविन्या’

  • टाटाने या नवीन कन्सेप्ट कारचे नाव संस्कृत भाषेतून घेतले आहे, ज्याचा अर्थ ‘आविष्कार’ असा होतो. शिवाय या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये IN देखील असून, जो भारत देश आणि इन्नोव्हेशन दर्शवतो.

  • टाटाने उच्च श्रेणीचे सॉफ्टवेअर डिझाईन केले असून, ते कार्बन ऊत्सर्जन कमी करण्यास मदत करते. शिवाय टाटाच्या ग्रीन मोबिलिटीला केंद्रस्थानी ठेवून कार्य करते. अविन्या याचेच उदाहरण आहे.

  • अविन्याची विशेष बाब अशी, की या कारचा लुक प्रीमियम हॅचबॅक श्रेणीप्रमाणे दिसतो. परंतु तिची कार्यक्षमता एमपीव्ही म्हणजेच मल्टी पर्पज व्हेईकलप्रमाणे असून ती एसयूव्ही क्रॉसओव्हर म्हणून निर्मित केली आहे.

  • अविन्याची रचना जनरेशन-३ अंतर्गत केली असून, जे टाटाकडून इलेक्ट्रिक वाहनांना विकसित करण्याचे नवीन व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) आहे. आगामी काळात टाटा सर्व ईव्ही याच प्लॅचफॉर्मवर निर्मित करणार आहे.

  • अविन्यामध्ये अल्ट्रा फास्ट चार्जिंग बॅटरीचा उपयोग केला जाणार आहे, ज्याद्वारे ही कार ३० मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होऊन ५००हून अधिक किलोमीटर धावेल, असा दावा केला जात आहे.

Web Title: Pranit Pawar Writes Curve Car And Avinya Car

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestylecarPranit Pawar
go to top