झूम : आत्मनिर्भर भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर | Electric Scooter | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Scooter
झूम : आत्मनिर्भर भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर

झूम : आत्मनिर्भर भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर

sakal_logo
By
प्रणीत पवार

इंधनाचे शंभरीपार गेलेले दर पूर्वीसारखे होण्याची शक्यता धूसर आहे. त्यात मोटरसायकल, स्कूटरच्या किमतीही पूर्वीच्या तुलनेत वाढल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटर किंवा मोटरसायकल घेण्याकडे वळत आहेत. सध्या बाजारात परदेशी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे पर्याय असताना, आत्मनिर्भर भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटरही बाजारात दाखल होत आहेत आणि आगामी काळात येणार आहेत, त्याचाच घेतलेला आढावा....

बूम ‘कॉर्बेट’

तमिळनाडू राज्यातील कोईम्बतूरमधील ‘बूम मोटर’ या कंपनीने लेझर फोकस्ड तंत्रज्ञानासह इव्ही अर्थात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश केला आहे. या कंपनीने नुकताच ‘कॉर्बेट’ ही बाईक भारतीय बाजारात दाखल केली. ही बाईक सर्वाधिक टिकाऊ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. चार्जिंग सुविधांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पोर्टेबल चार्जरसह बदलता येणारी स्मार्ट बॅटरीची सुविधा या बाईकमध्ये देण्यात आली आहे.

बॅटरी : २.३ किलोवॅट क्षमता. ४.६ किलोवॅटपर्यंत वाढवता येऊ शकते.

चार्जिंगसाठी वेळ : २.५ ते ४ तास

मोटर : ३ ते ४ किलोवॅट पीक

रेंज : कॉर्बेट १४ - १०० किलोमीटर, कॉर्बेट १४- ईएक्स - २०० किलोमीटर

सर्वोत्तम वेग : ६५ ते ७५ किमी प्रतितास

किंमत : ८६,९९९ ते १ लाख १९ हजार ९९९

प्युअर इव्ही ‘इट्रेन्स निओ’

हैदराबादची स्टार्टअप कंपनी ‘प्युअर इव्ही’ने इट्रेन्स निओ ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली. भारतातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन या स्कूटरची रचना करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटरमध्ये लिथियम बॅटरी देण्यात आली असून, ती दीर्घकाळ टिकणारी आहे. इट्रेन्समध्ये पोर्टेबल चार्जरसह बॅटरी देण्यात आली असून, ती कुठेही नेऊन चार्ज करता येणार आहे.

बॅटरी : २.५ किलोवॅट क्षमतेची लिथियम

चार्जिंगसाठी वेळ : ४ तास

मोटर : १.५ किलोवॅट नॉमिनल, २.२ किलोवॅट पीक

रेंज : ९० ते १२० किलोमीटर

सर्वोत्तम वेग : ६९ किमी प्रतितास

किंमत : ७८ हजार ९९९

ओला इलेक्ट्रिक ‘एस १’

१) तमिळनाडूनच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सध्या भारतीय बाजाराच बरीच चर्चा आहे. २०१९मध्ये भाविश अग्रवाल यांनी ही कंपनी विकत घेतली. ओलाची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘एस-१’ यावर्षी १५ ऑगस्टला लाँच झाली.

२) ओलाचे एस१ आणि एस१-प्रो असे दोन व्हेरिएंट १० विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. ऑक्टोबर २०२१मध्येच या स्कूटरची बुकिंग घेण्यास सुरुवात झाली. एस१ची किंमत ८५,०९९ आणि एस१-प्रोची किंमत १,१०,००० रुपयांपर्यंत आहे.

३) ऑर्टिफिशियल साऊंड सिस्टम, ४-जी कनेक्टिव्हिटी, व्हॉईस कमांड सिस्टम आदी आधुनिक फीचर्स दिले आहेत. ओला स्कूटर एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर १८० ते १९० किलोमीटर धावू शकते. तसेच ० ते ६० किलोमीटर प्रतितास वेग फक्त ३ सेकंदात घेते.

बाऊन्स ‘इन्फिनिटी’

१) बंगळूरमधील ‘बाऊन्स’ कंपनी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘इन्फिनिटी’ २ डिसेंबरला दाखल होणार आहे. या स्कूटरमध्ये ‘बॅटरी ॲज अ सर्व्हिस'' हा किफायतशीर पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना बाऊन्स इन्फिनिटी बॅटरीशिवाय विकत घेता येऊ शकते.

२) बाऊन्सद्वारे बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा उपयोग करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. या स्वॅपिंग नेटवर्कमध्ये ग्राहक रिकामी बॅटरी देऊन संपूर्णतः चार्ज केलेली बॅटरी घेतील तेव्हा त्यांना फक्त बॅटरी स्वॅप्सचे पैसे भरावे लागतील.

३) बाऊन्स इन्फिनिटीमध्ये स्मार्ट, काढता येण्याजोगी ली-आयन बॅटरी आहे. आपल्या सोयीनुसार आणि आवश्यकतेनुसार ती चार्ज करता येते. तसेच इन्फिनिटीमध्ये २.१ किलोवॅट क्षमतेची हब मोटर दिली जाण्याची शक्यता असून ही दुचाकी ८० किलोमीटर प्रतितास वेगात जाऊ शकते.

loading image
go to top