
प्रतीक्षा शिवणकर आणि अभिषेक साळुंखे
एकत्र राहणं, आयुष्यभराची साथ देणं हे फक्त प्रेमावर नाही, तर मैत्रीवरही तितकंच अवलंबून असतं. अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर आणि तिचा नवरा अभिषेक साळुंखे यांचं नातं याचं उत्तम उदाहरण आहे. ‘लवकरच तुला जपणार आहे’ या आगामी मालिकेतील प्रमुख अभिनेत्री प्रतीक्षा आणि तिच्या आयुष्याचा पार्टनर अभिषेक, दोघंही एकमेकांना नवऱ्या-बायकोपेक्षा जास्त ‘बेस्ट फ्रेंड्स’ मानतात.