esakal | Relationship Tips: घटस्फोटीत जोडीदाराला डेट करणं नसतं सोपं
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips: घटस्फोटीत जोडीदाराला डेट करणं नसतं सोपं

Relationship Tips: घटस्फोटीत जोडीदाराला डेट करणं नसतं सोपं

sakal_logo
By
शरयू काकडे

Dating Tips: प्रेमावर कोणाचेही बंधन नसते असे म्हणतात.त्यामुळे माणसाला कधी, कोणासोबत प्रेम होईल हे सांगता येत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती व्यक्ती आधी घटस्फोटीत असू शकते. पण प्रेम खरे असेल तर या गोष्टींचा काही फरक पडत नाही. पण आजही आपल्या समाजात घटस्फोटीत असणे अजूनही चूकीचे समजले जाते. आजही लोक घटोस्फोटला टॅबू समजतात.

घटस्फोटीत व्यक्तीसोबत त्याची आधीच आयुष्याचे काही पैलू देखील जोडलेले असतात जसे की, कोर्ट केस, कस्टडी वाद, अतुट समजले जाणारे नातं तुटणे इ. यासोबतच समाजाचे टोमणेही सहन करावे लागतात. अशावेळू तुम्ही जर घटस्फोटीत व्यक्तीला डेट करत असाल तर तुम्हाला इमोशनली खूप मजबूत असणे गरजे असते. कधी कधी जुन्या नात्यांच्या कडू आठवणी व्यक्तीची पाठ सोडत नाही. आशा वेळी काय करावे, आयुष्य सोपे कसे होईल यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

हेही वाचा: Advice for Teenagers : मित्रांसोबत बाहेर जाताना आई-बाबांसोबत वाद कसा टाळू?

भूतकाळाचा स्विकारणे गरजेचे

जेव्हा पण तुम्ही घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा त्यांच्या सोबत नाते पुढे वाढवू इच्छित असाल तर हे कायम लक्षात ठेवा की, तुम्हाला जोडीदारासोबत त्याचा भूतकाळाही जोडला आहे. हा भूतकाळ तुम्हाला स्विकारावा लागेल. तुमच्या जोडीदाराचे आधी लग्न झालेले असू शकते, त्याची मूल असू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबतही नाते जोडावे लागेल. यासोबतच तुम्हाला आधीच्या जोडीदारासोबतही चांगले संबध ठेवावे लागतील. मुल आणि त्यांच्यामुळे आधीच्या जोडीदारीची देखील तुमच्या आयुष्यात महत्वाचे आहे हे तुम्हाला समजून घ्यायला हवे. तसेच तुम्हाला त्यांना एक कुटुंबाप्रमाणे स्पेस द्यावी लागेल.

पार्टनरला वैयक्तित स्पेस द्या

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आपले पर्सनल स्पेसची गरज असते. घटस्फोटीत व्यक्तीला डेट करताना तुम्हाला या गोष्टीचे भान असणे गरजेचे आहे. पर्सनल स्पेस दिल्यामुळे जुन्या नात्यांमधील कडूता विसरून तुमच्यासोबत नॉर्मल वागू शकतात. तसेच ते त्यांच्या मुलांना देखील व्यवस्थित टाईम देऊ शकतात. ही पर्सनल स्पेस त्यांचे आणि तुमचे नात्यांला सुधारण्यासाठी मदत करेल.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरा करतात? काय आहे महत्त्व?

जोडीदारावर विश्वास ठेवा

कित्येकदा लोक प्रेम करतात पण जेव्हा नाते निभाविण्याची वेळ येते तेव्हा मनात कित्येक शंका निर्माण होतात. कधी कधी कित्येक कारणांसाठी आपल्या पूर्व जोडीदारालाला भेटावे लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवायला हवा. हाच विश्वास नात्याला मजबूत आणि अतूट बनवू शकतात.

दया नव्हे प्रेम गरजेचे

तुमच्या जोडीदारानेआयुष्यात कित्येक चढ-उतार पाहिले असतील यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर दया दाखवू नका. ज्या नात्यामध्ये प्रेम असते तिथे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची जागा नसते. त्यामुळे जोडीदाराच्या मनात खेद निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा वाईट काळातून बाहेर पडून नवीन आयुष्य सुरू केल्याबद्दल त्यांचे कौतूक करा.

loading image
go to top