केसांच्या समस्येने त्रस्त आहात? जीवनशैलीत करा 'हे' पाच बदल

केसांशी निगडीत समस्या दूर करणारे काही घरगुती उपाय
केसांच्या समस्येने त्रस्त आहात? जीवनशैलीत करा 'हे' पाच बदल
Updated on

ऋतू बदलला की त्याचा कमी-अधिक परिणाम आपल्या त्वचा व केसांवर होत असतो. यात अनेकदा हिवाळा किंवा पावसाळा आला की केस गळणे (hair loss), तुटणे, डोक्यात कोंडा होणे अशा समस्या निर्माण होतात. परंतु, उन्हाळा सुरु झाला की केसात सतत घाम येणे, डोक्याला खाज सुटणे या समस्येने बेजार व्हायला होतं. यात डोक्यात खाज आल्यावर तर जीव नकोसा होतो. अनेक महागडी औषधे, डॉक्टरांकडील गोळ्या खाल्यावरही समाधानकारक रिझल्ट काही मिळत नाही. म्हणूनच, डोक्याशी निगडीत समस्या दूर करणारे काही घरगुती उपाय पाहुयात. (protect your scalp from getting itchy dry)

केसांच्या समस्येने त्रस्त आहात? जीवनशैलीत करा 'हे' पाच बदल
फळं खरेदी केल्यावर तुम्ही नाही ना करत 'ही' चूक

१. केस स्वच्छ धुणे -

ज्या पद्धतीने आपण दररोज अंघोळ करुन शरीराची स्वच्छता राखत असतो. त्याच पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ धुतले पाहिजे. उन्हाळ्यात हे प्रमाण दोन वरुन तीन वेळा करावे. त्यामुळे डोक्यात जमा होणारी धूळ, घाम, तेल यांचा थर निघून जातो व डोक्यात खाज येत नाही.

२. तणाव कमी करा -

कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे किंवा सतत काळजी करणे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. यात अनेकदा अतिकाळजी किंवा अतिचिंता केल्यामुळे केसांचे विकार होतात. त्यामुळे जास्त ताण घेऊ नये.

३. केसांची निगा राखा -

अनेक मुली किंवा स्त्रिया नियमित केसांना तेल लावत नाही. त्यामुळे केसांच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होतो. तसंच काही जणी प्रमाणापेक्षा जास्त तेल लावतात त्यामुळे टाळूवर तेलाचा एक थर जमा होतो. ज्यामुळे केस गळण्याची शक्यता असते.

४. सौम्य शाम्पू, कंडिशनर वापरा -

केस स्वच्छ धुण्यासाठी कायम सौम्य शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा. त्यामुळे केसांना हानी पोहोचत नाही. तीव्र केमिकल असलेला शाम्पू वापरल्यास केस कोरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे शाम्पू व कंडिशनर कायम सौम्य वापरावेत.

५.भरपूर पाणी प्या -

आपल्या शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे तहान नसेल तरीदेखील भरपूर पाणी प्यावं. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डोक्यावरची त्वचा कोरडी पडते व डोक्यात कोंडा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com