Rakul Preet Singh : वेडींग सिजनला बोल्ड दिसायचंय; ट्राय करा रकुल प्रीतचे हे बॅकलेस ब्लाऊज डिझाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakul Preet Singh blouse style

Rakul Preet Singh : वेडींग सिजनला बोल्ड दिसायचंय; ट्राय करा रकुल प्रीतचे हे बॅकलेस ब्लाऊज डिझाईन

Backless Style Blouse Design : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. व्यस्त असूनही ती आपल्या स्टाइलची विशेष काळजी घेताना दिसते. कोणत्याही कार्यक्रमात रकुलचा लुक पाहण्यासारखा असतो. प्रत्येकवेळी ती चाहत्यांना आकर्षित करत असते. याआधी तिने अनेक वेगवेगळे लुक ट्राय केले आहेत. देसी टच असलेला मॉडर्न लुक करणे ही तर रकुलची खासियत आहे.

हेही वाचा: Rakul Preet Singh : मालदीवच्या किनाऱ्यावर रकुलचा हॉट बिकीनी अंदाज

वेडींग लुकसाठी काहीतरी वेगळे हवे असेल तर रकुल प्रीत सिंगचे हे लेहेंगा लूक शॉर्टलिस्ट करा. जे तुम्हाला अधिकच बोल्ड बनवतील. बॅकलेसचा नवा ट्रेंड यंदाच्या वेडींग सिजनमध्ये तूम्हाला पहायला मिळेल. त्यामुळे तूम्हीही ट्रेंडनूसार रकुलच्या या ड्रेसिंग स्टाइलची कॉपी करू शकता.

हेही वाचा: Rakul Preet Singh : रकूल प्रितचा सोशल मिडीयावर धूमाकूळ

यंदाच्या दिवाळी पार्टीसाठी रकुलने एक आकर्षक लेहेंगा घातला होता. अनेक रंग आवडणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचे कलर कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट होते. या लेहंग्यावर रकुलने बॅकलेस मॅचिंग प्रिंटेड ब्लाउज घातला होता. ब्लाउजच्या दोन्ही बाजूला असलेल्या आरशांचे फुल वर्क करण्यात आले होते. या लुकला अजून उठावदार बनवण्यासाठी रकुलने मोठे इअररींग घातले होते.

हेही वाचा: Rakul Preet Singh : रकुल प्रितचा फेस्टिव्ह अवतार

पेस्टल आणि न्यूट्रल्स कलर हे वेडींग सिजनसाठी नेहमीच फेव्हरेट ऑप्शन राहीले आहेत. तूम्हालाही असे कलर हवे असतील तर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला रकुल प्रीत सिंगचा मेटॅलिक सिक्विन लेहेंगा पहा. त्यावर रकुलने कॉर्सेट-स्टाईल ब्लाउज आणि मॅचिंग दुपट्टा घेतला होता. त्यावर तिने लाइट मेकअप केला आहे.

हेही वाचा: Rakul Preet Singh: रकुलचा शरारात किलर लूक...

अनेक रंग, असंख्य शेड्स आणि परफेक्ट स्ट्रक्चर एकत्र केल्यावर एक परफेक्ट वेडींग लुक तयार होतो. रकुलचा ग्रीन गार्डन प्रिंट टायर्ड लेहंगा त्याचेच उदाहरण आहे. या लेहंग्यावर तिने मिररले वर्क असलेला ब्लाऊज घातला आहे. तुमच्या खास मित्राच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी कॉर्सेटस्टाइलमधील ब्लाउज तुम्हाला परफेक्ट लुक देईल. त्यावर तिने हलका मेकअप आणि मोठे इअररींग्ज घातले आहेत.