Ram Charan News : ऑस्करपेक्षा रामचरणने पत्नीसह बेबीमूनचा जास्त आनंद लुटला, बेबीमून म्हणजे नक्की काय?

Ram Charan News: बेबीमून म्हणजे नेमकं काय, आणि हल्ली लोक बेबीमून का साजरा करताय याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत
Ram Charan Birthday
Ram Charan Birthdayesakal
Updated on

Ram Charan On Babymoon With Wife : साउथचा प्रसिद्ध कलाकार राम चरण याच्या नाटू नाटू या गाण्याला ऑक्सर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. यासाठी रामचरण पत्नीसह यूएसला पोहोचला. मात्र यावेळी त्याने ऑक्सर सन्मानसोहळ्यापेक्षा जास्त पत्नीसह बेबीमून एन्जॉय केलं. बेबीमून म्हणजे नेमकं काय, आणि हल्ली लोक बेबीमून का साजरा करताय याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

ऑस्कर 2023 साठी यूएसला पोहोचलेला RRR चित्रपटाचा नायक रामचरण यानेही आपल्या पत्नीसोबत बेबीमून साजरा केला. दोघांनीही प्रवासादरम्यान भरपूर शॉपिंग केली, डॉल्फिन पाहण्यासोबतच खूप मजा केली. त्यांच्या या क्षणाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

ऑस्कर 2023 मधून वेळ काढून रामचरणने त्याची गर्भवती पत्नी उपासना हिला बेबीमूनसाठी नेले. उपासनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये दोघेही निसर्गाचा आनंद घेताना, खरेदी करताना आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत होते.

पत्नीला बेबीमूनला घेऊन जाण्यासाठी तिच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढल्याबद्दल उपासनाने तिच्या इंस्टाग्रामवर त्याचे आभारही मानले होते. तिच्या व्हिडिओवर उपासनाने 'खूप व्यस्त असतानाही आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद' असे कॅप्शन दिले आहे.

यापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही बेबीमूनला गेले आहेत. तुम्ही पण विचार करत असाल की हनिमूनबद्दल ऐकले आहे, पण बेबीमून म्हणजे काय? चला तर याबाबत आज सविस्तर जाणून घेऊया.

Ram Charan News
Ram Charan News

हेल्थलाइनच्या मते, बेबीमून हा हनिमूनसारखाच असतो, जो एक व्हेकेशन सेलिब्रेशनसारखा असतो, पण लग्नानंतर तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्याऐवजी तुम्ही बाळाच्या आगमनापूर्वी त्यांच्यासोबत काही दर्जेदार वेळ घालवता. आजकाल हा ट्रेंड खूप वाढला आहे.

बाळाच्या आगमनानंतर, पती-पत्नीची भूमिका बदलते आणि ते पालक बनतात. बाळाला सांभाळणे या जबाबदाऱ्यांमध्ये दोघांनाही एकमेकांसाठी कमी वेळ मिळतो.

निदान मूल एक वर्षाचे होईपर्यंत नवरा-बायकोला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बेबीमूनच्या मदतीने दोघेही बाळाच्या आगमनापूर्वी काही वेळ एकत्र घालवू शकतात.

बेबीमूनला जाण्याची योग्य वेळ कोणती?

बेबीमूनला कधी जायचे याची ठराविक अशी काही वेळ नाही. तुम्हाला हवे तेव्हा गरोदरपणात तुम्ही बेबीमूनला जाऊ शकता. तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत बेबीमूनलाही जाऊ शकता.

जेव्हा तुम्हाला सर्वात सोयीस्कर वाटत असेल तेव्हा तुमच्या बेबीमूनची योजना करा. साधारणपणे, महिलांना गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत बरे वाटते, त्यामुळे हा काळ बेबीमूनसाठी सर्वोत्तम असू शकतो.

Ram Charan Birthday
Babymoon : आलिया भट्टने शेअर केला पहिला फोटो; सोनम कपूर म्हणाली...

बेबीमूनसाठी कोठे जावे?

यावेळी अनेक प्रकारचे व्हायरस (Viral) पसरतात, त्यामुळे तुम्ही तुमचा बेबीमून डेस्टिनेशन थोडा विचार करूनच निवडावा. याशिवाय मलेरियाचा धोका असलेल्या ठिकाणी जाणेही टाळावे. गरोदरपणात मलेरियामुळे गर्भपात, अकाली प्रसूती आणि अगदी मृत जन्म होऊ शकतो.

मलेरिया हा एक घातक रोग आहे जो संक्रमित डासांमुळे पसरतो. बेबीमूनसाठी कोरोनाबाधित ठिकाणे आणि देशांमध्ये प्रवास करणे टाळा, अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सहलीवरच नाही तर तुमच्या गर्भधारणेवरही होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com