Ram Navami 2024 : नक्षलवाद्यांनी बंद केलेलं श्री रामांच मंदिर २१ वर्षांनी उघडलं, माओवाद्यांनीही बनवला होता अड्डा!

हे मंदिर उघडण्यात CRPF च्या 74 व्या टिमच्या जवानांचा मोठा वाटा आहे
Ram Navami 2024
Ram Navami 2024esakal

Ram Navami 2024 :

भारतात अलिकडेच श्री रामांच्या भव्यदिव्य अशा मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पण, भारतात असलेल्या एका श्री रामांच्या मंदिराचे दरवाजे मात्र २१ वर्ष बंद होते. हे मंदिर इतके दिवस का बंद होतं? आणि गावकऱ्यांनी कोणाच्या भितीमुळे हे मंदिर उघडले नव्हते. त्यामागील कारण आपण जाणून घेऊयात.

छत्तीसगडच्या बस्तरमधील नक्षलग्रस्त भागात असलेले राम मंदिर २१ वर्षांनंतर अखेर पुन्हा उघडण्यात आले आहे. मागील आठवड्यातच हे मंदिर उघडण्यात आले. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी पुढे येऊन मंदिराची स्वच्छता केली. यानंतर सर्वांनी मिळून प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची पूर्णपणे स्वच्छता केली आणि मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली. (Ram Mandir)

Ram Navami 2024
Ayodhya Ram Mandir : आ. समाधान आवताडेच्या माध्यमातून 280 कार्यकर्ते अयोध्या दर्शनासाठी मार्गस्थ

हे मंदिर उघडण्यात CRPF च्या 74 व्या टिमच्या जवानांचा मोठा वाटा आहे. यावेळी सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, 2003 मध्ये नक्षलवाद्यांनी हे मंदिर जबरदस्तीने बंद केले होते. हा तो काळ होता जेव्हा या भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव खूप जास्त होता.

पुढे ते म्हणाले की, नक्षलवादी आणि माओवाद्यांनी धमकी दिली होती की कोणीही गावकरी हे मंदिर उघडणार नाही. आणि येथे पूजा करणार नाही. नक्षलवादी आणि माओवाद्यांनी विचारपूर्वक डावपेच आखत हे मंदिर बंद केले होते.

Ram Navami 2024
Ayodhya Ram Mandir: पैसे देऊन राम मंदिरात कोणतेही व्हीआयपी दर्शन नाही, ट्रस्टचे स्पष्टीकरण...

हा भाग माओवादी आणि नक्षलवाद्यांचा अड्डा होता. येथे ते आपल्या सर्व बैठका घेऊन हल्ल्याची रणनीती आखायचे. या बैठकांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मंदिर बंद ठेवण्यात आले होते.

बस्तर भागात सुमारे ४० सुरक्षा छावण्या उभारण्यात आल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना गावापर्यंत पोहोचणे सोपे झाले. केरळपेंडा आणि लखपाल गावांदरम्यान एक सुरक्षा दलही देखील उभारण्यात आले जेणेकरून स्थानिक आदिवासी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संवाद प्रस्थापित करता येईल, जे पूर्वी शक्य नव्हते. असेच एके दिवशी संभाषण सुरू असताना एका CRPF जवानाचे लक्ष या बंद मंदिराकडे गेले. (Ram Mandir)

गावकऱ्यांना विचारल्यावर कळले की २००३ मध्ये नक्षलवाद्यांनी या मंदिराचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ते बंद करण्यात आले होते. हे मंदिर केव्हा आणि कोणी बांधले याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पण हे मंदिर १९७० च्या दशकात बांधल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Ram Navami 2024
Ayodhya Ram Mandir: पैसे देऊन राम मंदिरात कोणतेही व्हीआयपी दर्शन नाही, ट्रस्टचे स्पष्टीकरण...

जवळपास २ दशके बंद राहिल्यानंतर, छत्तीसगडचे हे मंदिर चैत्र नवरात्रीच्या दरम्यान खुले झाले आहे. या आनंदात स्थानिक गावातील नागरिकांनी रामनवमीचा सण थाटामाटात साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे.

मंदिराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या सुमारे ८०० लोकांनी रामनवमीच्या काळात येथे भंडारा घेण्याचे नियोजन केले आहे. यासोबतच मंदिर परिसर सुशोभित करण्यात येत असून रामललाची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, यावर्षी रामनवमीचा सण १७ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com